स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, तब्बल 13 हजार 735 पदांसाठी भरती

स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI मध्ये लिपिकासाठी 13,000 हून अधिक पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी 2025 आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, तब्बल 13 हजार 735 पदांसाठी भरती
sbi vacancy
Follow us
| Updated on: Dec 19, 2024 | 4:10 PM

SBI Clerk Recruitment 2024 : तुम्ही सरकारी बँकांमध्ये नोकरीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने लिपिकाची बंपर जागा जाहीर केली असून, त्याअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एकूण 13,735 पदे भरण्यात येणार आहेत. जे उमेदवार एसबीआयमध्ये ज्युनिअर असोसिएट (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स) या पदांसाठी अर्ज करू इच्छितात, ते एसबीआय sbi.co.in च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. यासाठी 17 डिसेंबरपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून शेवटची तारीख 7 जानेवारी 2025 आहे.

‘या’ तारखा तपासा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 17 डिसेंबर 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 7 जानेवारी 2025
  • फेब्रुवारी 2025 मध्ये होण्याची शक्यता
  • मुख्य परीक्षेची तारीख: मार्च/एप्रिल 2025 मध्ये होण्याची शक्यता

शैक्षणिक पात्रता काय आहे?

एसबीआयमध्ये या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारकडून मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. इंटिग्रेटेड ड्युअल डिग्री (आयडीडी) प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांनी 31 डिसेंबर 2024 पर्यंत किंवा त्यापूर्वी पदवी पूर्ण केल्याची खात्री करावी.

वयोमर्यादा काय आहे?

उमेदवाराची वयोमर्यादा 1 एप्रिल 2024 रोजी 20 वर्षापेक्षा कमी आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नसावी म्हणजेच उमेदवाराचा जन्म 2 एप्रिल 1996 पूर्वी आणि 1 एप्रिल 2004 नंतर झालेला नसावा.

एसबीआय sbi.co.in च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. यासाठी 17 डिसेंबरपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून शेवटची तारीख 7 जानेवारी 2025 आहे.

निवड प्रक्रिया काय आहे?

एसबीआयमधील लिपिक या पदांसाठी उमेदवारांची निवड तीन टप्प्यात केली जाईल, ज्यात पूर्व परीक्षा आणि मुख्य यांचा समावेश आहे. याशिवाय उमेदवाराने निवडलेल्या स्थानिक भाषेच्या चाचणीचाही यात समावेश आहे.

पूर्व परीक्षेत 100 गुणांचे वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार असून, त्यासाठी उमेदवारांना एकूण 1 तास मिळणार आहे.

अर्ज शुल्क काय आहे?

जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 750 रुपये आहे, तर एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/एक्सएस/डीएक्सएस प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. डेबिट कार्ड/ क्रेडिट कार्ड/ इंटरनेट बँकिंगचा वापर करून शुल्क भरता येते. एसबीआयची अधिकृत वेबसाईटची माहिती जाणून घ्या.

एसबीआयची अधिकृत वेबसाईट

अधिक माहितीसाठी उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात. sbi.co.in ही एसबीआयची अधिकृत वेबसाईट आहे.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.