SBI Clerk Result 2021 : स्टेट बँक ऑफ इंडिया क्लार्क पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, मुख्य परीक्षेची प्रवेशपत्र जारी
सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळख असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये क्लार्क केडरमधील ज्युनिअर असोसिएटस पदासाठी घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.
SBI Clerk Result 2021नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळख असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये क्लार्क केडरमधील ज्युनिअर असोसिएटस पदासाठी घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. स्टेट बँकेने पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करताना मुख्य परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं जाहीर केली आहेत. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले असून ऑक्टोबर महिन्यात ही परीक्षा होणार आहे. मुख्य परीक्षा देणारे उमेदवार 17 ऑक्टोबरपर्यंत प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात.
स्टेट बँक क्लार्क परीक्षेचा निकाल कसा डाऊनलोड करायचा?
स्टेप 1 : स्टेट बँकेच्या sbi.co.in या वेबसाईटला भेट द्या
स्टेप 2 : स्टेट बँकेच्या वेबसाईट वरील करिअर टॅबवर क्लिक करा
स्टेप 3 : स्टेट बँके क्लार्क पूर्व परीक्षा निकाल लिंकवर क्लिक करा
स्टेप 4 : स्टेट बँक क्लार्क पूर्व परीक्षा निकालाची पीडीएफ फाईल ओपन होईल.
स्टेप 5 : पीडीएफमध्ये तुमचा रोल नंबर सर्च करा
मुख्य परीक्षेत काय विचारणार?
स्टेट बँक क्लार्क मुख्य परीक्षा ही 2 तास 40 मिनिटं घेतली जाणार आहे. यामध्ये सामान्य ज्ञान, आर्थिक जागरुकता, इंग्रजी भाषा, तार्किक क्षमता, गणितीय क्षमता यासंबंधी 190 प्रश्न असतील. चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील.
पगार
स्टेट बँकेच्या ज्युनिअर असोसिएटस पदावर निवड झालेल्या उमेदवारांना 17 हजार 900 ते 47 हजार 920 पगार मिळेल.
भारतीय रेल्वे 50 हजार युवकांना प्रशिक्षण देणार
भारतीय रेल्वेनं विद्यार्थ्यांना रेल्वेचं काम आणि रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये चालणाऱ्या कामाची माहिती व्हावी म्हणून चांगल पाऊल उचललं आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी युवकांना सशक्त बनवण्यासाठी रेल्वे कौशल्य विकास योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पहिल्या तीन वर्षात 50 हजार युवकांना प्रशिक्षित करणार आहे. या योजनेचं उद्घाटनं केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. रेल्वे मंत्र्यांनी यावेळी यासंदर्भातील माहिती दिली होती.
सुरुवातीच्या टप्प्यात 1 हजार युवकांना प्रशिक्षण
रेल्वे कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात 1 हजार युवकांना प्रशिक्षण देणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना इलेक्ट्रिशियन, वेल्डर, मशिनिस्ट, फिटर अशा ट्रेडचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. यानंतर प्रादेशिक विभागांच्या मागणीनुसार आणि रेल्वेच्या विभागीय विभागांच्या उत्पादन करणाऱ्या विभागांच्या मागणीनुसार प्रशिक्षण कार्यक्रमांची संख्या वाढवली जाणार आहे. हे प्रशिक्षण मोफत दिलं जाणार आहे. प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या उमेदवारांची निवड त्यांच्या दहावीच्या गुणांच्या आधारावर केली जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली जाणार आहे. याचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करावे लागतील.
इतर बातम्या:
Bank Job 2021: स्टेट बँकेत ‘या’ पदासाठी भरती, 47920 रुपयांपर्यंत पगार मिळणार
SBI clerk job notification 2021: स्टेट बँकेत 5 हजार जागांवर बंपर भरती, 49 हजारांपर्यंत पगार
SBI clerk Result 2021 declared on sbi co in how to check result