SBI SCO Recruitment 2021: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी पदावर संधी, 42 हजारांपर्यंत पगार मिळणार
भारतीय स्टेट बँकेत नोकरी मिळवण्याची एक चांगली संधी निर्माण झाली आहे. ज्या उमेदवारांनी स्टे बँक ऑफ इंडियाच्या स्पेशालिस्ट केडर ऑफिसर आणि मॅनेजर पदासाठी अर्ज केला नसेल, ते अर्ज करु शकतात.
SBI SCO Recruitment 2021 नवी दिल्ली: भारतीय स्टेट बँकेत नोकरी मिळवण्याची एक चांगली संधी निर्माण झाली आहे. ज्या उमेदवारांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्पेशालिस्ट केडर ऑफिसर आणि मॅनेजर पदासाठी अर्ज केला नसेल, ते अर्ज करु शकतात. या पदासाठी अर्ज करण्यासाठी एक संधी देण्यात आलेली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 15 जून पासून सुरु झाली आहे. (SBI Job 2021 Vacancy for Special Cadre Officer and Fire engineer in State Bank of India check details here)
SBI च्या वेबसाईटला भेट द्या
एसबीआय स्पेशालिस्ट केडर ऑफिसर आणि मॅनेजर पदासाठी पात्र असणारे उमेदवार स्टेट बँकेच्या www.sbi.co.in/careers या वेबसाईटवर बेट देऊन अर्ज करु शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची अखेरची तारीख 28 जून निश्चित करण्यात आली आहे.
पदांची संख्या
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या भरतीप्रक्रियेनुसार CRPD/ SCO-FIRE /2020-21 आणि CRPD/SCO 2021-22/06 नुसार इंजिनिअर (फायर ) आणि मॅनेजर पदासाठी भरती होणार आहे. इंजिनिअर फायर आणि मॅनेजर पदाच्या एकूण 16 जागांवर भरती होणार आहे.
डिसेंबरमध्ये अर्ज भरलेल्यांना पुन्हा अर्ज भरण्याची गरज नाही
नियमित स्वरुपात स्टेट बँक ऑफ इंडियानं स्पेशालिस्ट केडर ऑफिसर भरतीसाठी डिसेंबर 2020 आणि जानेवारी 2021 दरम्यान अर्ज मागवले होते. त्यावेळी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 11 जानेवारी देण्यात आली होती. त्यावेळी अर्ज केलेल्या उमदेवारांनी आता अर्ज करु नयेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.
पात्रता
इंजिनिअर फायर पदासाठी अर्ज करणारे उमेदवार भारत सरकार आणि यूजीसीच्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई (फायर) आणि बीटेक (सेफ्टी अँड फायर इंजिनिरिंग ), बी.टेक . (फायर टेक्नॉलॉजी अँड सेफ्टी इंजिनिअरिंग) किंवा बीएस्सी फायर उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. नॅशनल फायर सर्व्हिसेस नागपूर येथून पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. मॅनेजर पदासाठी कोणत्याही शाखेतून पदवीधर ,एबीए किंवा पीजीडीएम पूर्ण केलेले असावे. एनबीएफसीमध्ये काम केल्याचा किमान 7 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया
स्टेट बँक उमदेवारांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जांची पडताळणी, शैक्षणिक गुणवत्ता, अनुभवाच्या आधारे योग्य उमेदवारांना मुलाखतीला बोलवेल. मुलाखत 100 गुणांची असेल. बँकेकडून योग्य उमेदवारांची निवड केली जाईल. निवड झालेल्या उमदेवारांना 23 हजारांपासून ते 42 हजारांपर्यंत पगार मिळणार आहे.
अमेरिकेच्या कृषी विभागाचा भारतातील राज्य सरकारसोबतचा पहिला करार महाराष्ट्राच्या कृषी मंत्रालयाशी, कराराचा नेमका फायदा काय?https://t.co/Mqe1PMPcIv#Maharashtra | #America | #agriculture | #agriculturenews | @dadajibhuse | @vishwajeetkadam | @ShivSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 16, 2021
संबंधित बातम्या:
MHT CET Exam: महाराष्ट्रात CET परीक्षा कधी? मंत्री उदय सामंतांनी दिली महत्त्वाची माहिती
NLC Exam 2021: हेल्थ इन्स्पेक्टर परीक्षेसाठीचं अॅडमिट कार्ड जारी, असं करा डाऊनलोड
(SBI Job 2021 Vacancy for Special Cadre Officer and Fire engineer in State Bank of India check details here)