SBI Recruitment 2021: स्टेट बँक इंडियामध्ये 606 जागांवर बंपर भरती, पदवीधर उमेदवारांना सुवर्णसंधी
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये 606 जागावंर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. स्टेट बँकेच्या sbi.co.in वेबसाईटवर 18 ऑक्टोबर 2021 अर्ज दाखल करु शकतात.
SBI Recruitment 2021 नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये 606 जागावंर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. एसबीआयमध्ये स्पेशालिस्ट केडरमध्ये वेल्थ मॅनेजमेंट, मार्केटिंग आणि एक्झ्युकेटीव्ह पदांसाठी पदवीधर आणि पदव्युत्तर पदवी आणि एमबीए उत्तीर्ण उमेदवारांना ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रेजुएट, एमबीए उत्तीर्ण अर्ज दाखल करु शकतात. स्टेट बँकेच्या sbi.co.in वेबसाईटवर 18 ऑक्टोबर 2021 अर्ज दाखल करु शकतात.
SBI Recruitment Eligibility:पात्रता
वेल्थ मॅनेजमेंट, मार्केटिंग आणि एक्झ्युकेटीव्ह या पदासांठी पदनिहाय वेगवेगळी पात्रता निश्चित करण्यात आली आहे. पदनिहाय वयोमर्यादा देखील निश्चित करण्यात आली आहे. उमदेवार स्टेट बँकेच्या वेबसाईटला भेट देऊन नोटिफिकेशन पाहू शकतात.
SBI Recruitment Eligibility Important Dates: महत्वाच्या तारखा
अर्ज दाखल करण्यास सुरुवात: 29 सप्टेंबर 2021 अर्ज दाखल करण्यासाठी अखेरचा दिवस: 18 ऑक्टोबर
अर्जाचं शुल्क
स्टेट बँकेतील या पदांसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गातील उमदेवारांसाठी 750 रुपये शुल्क निश्चित करण्यात आलं आहे. तर, इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अर्जाचं शुल्क भरावं लागणार नाही. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटला भेट देऊन भरती प्रक्रियेसंदर्भात सविस्तर माहिती घेणं आवश्यक आहे. sbi.co.in या वेबसाईटवर सविस्तर नोटिफिकेशन उपलब्ध होईल.
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन 96 पदांवर भरती
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं विविध पदांसाठी जाहिरात दिली आहे. मेट्रोमध्ये मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उप, महाव्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ तंत्रज्ञ आणि खाते सहाय्यक या पदांसाठी भरती करणार आहे. विविध पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑक्टोबर आहे. एकूण 96 पदं भरली जाणार आहेत.
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ने विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या रिक्त पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया Mahametro.org वर सुरू झाली आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार 14 ऑक्टोबर 2021 पर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 96 पदांची भरती केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
इतर बातम्या:
sbi recruitment 2021 for 606 positions in state bank of India know details