संरक्षण दलात सैन्य अधिकारी व्हायचंय, महाराष्ट्र शासनाची संस्था देतेय सेवापूर्व तयारी प्रशिक्षण, अर्ज करण्याचं आवाहन

महाराष्ट्र सरकारनं (Maharashtra Government) राज्यातील विद्यार्थ्यांना संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून जास्तीत जास्त संख्येने जाता यावे यासाठी औरंगाबाद (Aurangabad) येथे सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची (Services Preparatory Institute) स्थापना केलीय.

संरक्षण दलात सैन्य अधिकारी व्हायचंय, महाराष्ट्र शासनाची संस्था देतेय सेवापूर्व तयारी प्रशिक्षण, अर्ज करण्याचं आवाहन
SPI Aurangabad
Follow us
| Updated on: Dec 11, 2021 | 7:10 AM

मुंबई : महाराष्ट्र सरकारनं (Maharashtra Government) राज्यातील विद्यार्थ्यांना संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून जास्तीत जास्त संख्येने जाता यावे यासाठी औरंगाबाद (Aurangabad) येथे सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची (Services Preparatory Institute) स्थापना केलीय. या संस्थेकडून सैनिकी सेवापूर्व शिक्षण 46 व्या तुकडीसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. पात्र आणि इच्छूक विद्यार्थी 24 जानेवारी पर्यंत अर्ज दाखल करु शकतात.

पात्रता

सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबादकडून देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणासाठी अर्ज करणारा उमेदवार हा अविवाहित मुलगा असावा. उमेदवार महाराष्ट्राचा अधिवासी असावा. त्याचा जन्म 02 जानेवारी 2006 ते 31 डिसेंबर 2007 च्या दरम्यान झालेला असावा. तर मार्च / एप्रिल / मे 2022 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत परीक्षेला बसणारा असावा. म्हणजेच जून 2022 मध्ये इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा.

शारिरीक पात्रता

उमेदवार हा सैन्यदलात अधिकारी बनण्यासाठी दिलेल्या सर्व निकषांसाठी पात्र असावा. यूपीएससी, नॅशनल डिफेन्स अकादमी आणि इंडियन नावल अकादमी द्वारे निश्चित करण्यात आलेल्या शारिरीक निकष पूर्ण करत असावा. हे निकष UPSC आणि सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबादच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. उमेदवाराची उंची 157 सें.मी., वजन 43 कि.ग्रा. कमीत कमी छाती न फुगवता-74 से.मी., फुगवून-79 से.मी., रातांधळा किंवा रंगांधळेपणा नसावा. चष्मा (-) 2.0 D पर्यंत असावा.

निवड प्रक्रिया

सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था औरंगाबाद यांच्याकडे अर्ज प्राप्त झाल्यानंतर उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखत यांच्याद्वारे केली जाईल. पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा इंग्रजी माध्यमातून 13 फेब्रुवारी 2022 रोजी विविध केंद्रावर घेतली जाईल.

लेखी परीक्षेचं स्वरुप

परीक्षेमध्ये एकाच प्रश्नपत्रिकेत 150 मार्कांचे बहुपर्यायी प्रश्न असतील त्यामध्ये 75 गणिताचे आणि 75 सामान्यज्ञानवर आधारित असतील. लेखी परीक्षा साधारणतः इयत्ता 8 वी ते 10 वी च्या स्टेट बोर्ड व सी.बी.एस.ई. च्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. प्रत्येक योग्य उत्तराला (1) गुण मिळेल व प्रत्येकी चुकीच्या उत्तराला (0.5) गुण वजा केले जातील. यशस्वी परीक्षार्थीना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. मुलाखती प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन होतील.

अर्ज कुठे करायचा?

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.splaurangabad.com या वेबसाईटला भेट द्यावी. परीक्षा शुल्क रुपये 450 ऑनलाईन फक्त क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, किंवा नेट बँकींग इत्यादी द्वारे भरावे. डिमांड ड्राफ्ट किंवा चलान द्वारे भरलेले परीक्षा शुल्क स्विकारले जाणार नाही. प्रवेश अर्ज संस्थेच्या अटी व भर्ती नुसार भरलेला नसल्यास अर्ज नामंजूर होइल. तसेच प्रवेश परीक्षा शुल्क परत मिळणार नाही. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2022 आहेय.

प्रवेशपत्र कधी मिळणार?

सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेकडून प्रवेशपत्र ऑनलाईन जारी केली जातील. उमदेवारांना हॉल तिकीट 07 फेब्रुवारी 2022 रोजी संस्थेच्या संकेत स्थळावरून डाऊनलोड करून घेता येईल. परीक्षा संबंधीत सूचनांसाठी वेळोवेळी www.spiaurangabad.com या वेबसाईटला भेट द्यावी.

इतर बातम्या:

दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! बोर्डाच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्जासाठी मुदत वाढ ; ‘या’ तारेखेपर्यंत करता येणार अर्ज

HSC SSC Exam : ओमिक्रॉनचा फटका, दहावी बारावी परीक्षेचं वेळापत्रक लटकलं, मूल्यांकनाचा पर्यायी फॉर्म्युला तयार?

Services Preparatory Institute Aurangabad invited applications for 46th batch

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.