पुण्याच्या शंंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयात विविध पदांवर भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर

पुण्यातील नामांकीत शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्यावतीनं सहोयागी प्राध्यापक आणि ग्रंथपाल पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पुणे येथील शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयातील या पदासाठी अर्ज करण्याची मुदत 2 सप्टेंबर आहे.

पुण्याच्या शंंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयात विविध पदांवर भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर
Follow us
| Updated on: Aug 31, 2021 | 6:48 PM

पुणे: पुण्यातील नामांकीत शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्यावतीनं सहोयागी प्राध्यापक आणि ग्रंथपाल पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पुणे येथील शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयातील या पदासाठी अर्ज करण्याची मुदत 2 सप्टेंबर आहे. पात्र उमेदवार थेट महाविद्यालयाशी संपर्क साधून भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती घेऊ शकतात. महाविद्यालयात अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांना मुलाखतीला बोलावलं जाणार आहे.

पदांचा तपशील

शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक आणि ग्रंथपाल पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

पात्रता

सहयोगी प्राध्यापक पदासाठी उमेदवार हा नेट, सेट आणि पी.एचडी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तर, विद्यापीठ अनुदान आयोगानं निश्चित केलेला अनुभव त्याकडे असणं आवश्यक आहे. याशिवाय त्यांनी संशोधन देखील करणं आवश्यक आहे. तर, ग्रंथपाल पदासाठी उमदेवारानं ए.लिब आणि ग्रंथालय व्यवस्थापन क्षेत्रातील नेट किंवा सेट उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

अर्ज कुठे पाठवायचा

सहयोगी प्राध्यापक आणि ग्रंथपाल पदासाठी अर्ज उमेदवार स्वत: महाविद्यालयात जाऊन जमा करु शकतात. याशिवाय पोस्टानं शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज, डेक्कन, पुणे 411004. या पत्त्यावर पाठवू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2021 इतकी आहे. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी शंकरराव चव्हाण विधी महाविद्यायाच्या वेबसाईटला भेट द्यावी.

न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेडमध्ये 300 पदांसाठी भरती

न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेडद्वारे प्रशासकीय अधिकारी पदासाठी भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आली आहे. नोटिफिकेशननुसार एकूण 300 पदांवर भरती होणार आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी संधी आहे. न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेडमध्ये अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट newindia.co.in वर भेट द्यावी लागेल.

न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेडने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, अर्ज सादर करण्याची प्रक्रिया 1 सप्टेंबर 2021 पासून सुरू होईल. अर्ज दाखल करण्यासाठी 21 सप्टेंबरपर्यंत वेळ दिला जाईल. अर्जाचं शुल्क 21 सप्टेंबर रोजीचं जमा करावं लागेल. दोन टप्प्यात परीक्षा आयोजित केली जाईल. त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल.मात्र, परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

रिक्त पदाचा तपशील

या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 1 सप्टेंबरपासून सुरू होईल. भरती प्रक्रियेंतर्गत एकूण 300 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 104 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. ओबीसीसाठी 81 जागा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजेच ईडब्ल्यूएससाठी 30 जागा, एससीसाठी 46 जागा, एसटीसाठी 22 जागा आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 17 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

पात्रता

उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे. अर्जदार 60% गुणांसह पदवीधर असावेत. इतर पात्रता तपशीलांसाठी, आपण अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

इतर बातम्या:

ISRO LPSC Recruitment 2021: इस्त्रो एलपीएससीमध्ये विविध पदांवर भरती, अर्ज कुठे करायचा?

SBI SCO Recruitment 2021: स्टेट बँकेत नोकरी मिळण्याची संधी, स्पेशालिस्ट केडर ऑफिसर पदासाठी भरती

Shankarrao Chavan Law College invites application for Associate Professor and Librarian

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.