Railway Recruitment 2021: ना परीक्षा ना मुलाखत, थेट दहावीच्या गुणांवर निवड, रेल्वेत 1785 जागांवर अप्रेटिंसची संधी

अप्रेंटिससाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरु होतं आहे. पात्र उमेदवार 14 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना कोलकाता विभागात अप्रेंटिस करण्याची संधी दिली जाईल.

Railway Recruitment 2021: ना परीक्षा ना मुलाखत, थेट दहावीच्या गुणांवर निवड, रेल्वेत 1785 जागांवर अप्रेटिंसची संधी
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Nov 14, 2021 | 10:26 AM

Railway Recruitment 2021 नवी दिल्ली: भारतीय रेल्वेमध्ये फिटर ,वेल्डर, वाईंडर, मशिनिस्ट, कार्पेंटर, इलेक्ट्रिशियन, पेंटर, मेकॅनिक आणि वायरमन या पदांसाठी अप्रेंटिस करण्याची संधी आहे. रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये 1785 पदांवर अप्रेंटिस करता येणार आहे.

अर्ज दाखल करण्याची मुदत?

अप्रेंटिससाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरु होतं आहे. पात्र उमेदवार 14 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना कोलकाता विभागात अप्रेंटिस करण्याची संधी दिली जाईल. अप्रेंटिस भरती प्रक्रिया आणि इतर अधिक माहितीसाठी उमेदवारांनी नोटिफिकेशन वाचणे आवश्यक आहे. पात्र उमेदवार https://ser.indianrailways.gov.in/ या वेबसाईटवर अर्ज दाखल करु शकतात.

शैक्षणिक पात्रता

रेल्वेतील अप्रेंटिस साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शाळेतून किमान 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे. तर, वेल्डर, वायरमन आणि कार्पेंटर या पदासाठी आठवी उत्तीर्ण उमेदवार देखील अर्ज करू शकतात. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. तर, इतर प्रवर्गातील उमेदवार आणि महिला उमेदवारांसाठी कोणताही शुल्क आकारलं जाणार नाही. गुणवत्ता यादी च्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल, असं कळवण्यात आलंय.

उमेदवारांची निवड कशा प्रकारे होईल?

उमेदवारांची निवड ही प्राप्त झालेल्या अर्जातून गुणवत्ता यादी तयार करुन करण्यात येणार आहे. उमेदवारांना दहावीला मिळालेले गुण आणि आयटीआय मध्ये मिळालेले गुण याच्याद्वारे गुणवत्ता यादी तयार करून निवड होईल. उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार नाही. या पदासाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.

इतर बातम्या:

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रात 100 पदांसाठी भरती, प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक पदासाठी संधी

स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत 408 जागांसाठी भरती, 35 हजारापर्यंत पगाराची संधी

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे सातारा जिल्ह्यात भरती, प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक पदासाठी संधी

South Eastern Railway Recruitment for Apprentice for 1785 post check details here

'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.