SSC CGL 2019 Skill Test : स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून CGL परीक्षेच्या कौशल्य चाचणीची तारीख जाहीर

स्टाफ सिलेक्शन कमिशननं संयुक्त पदवी परीक्षा 2019 च्या कौशल्य चाचणीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. संयुक्त पदवी परीक्षा 2019 च्या कौशल्य चाचणी परीक्षा 15 आणि 16 सप्टेंबर रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रावर होणार आहे.

SSC CGL 2019 Skill Test : स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून CGL परीक्षेच्या कौशल्य चाचणीची तारीख जाहीर
ssc
Follow us
| Updated on: Sep 11, 2021 | 12:11 PM

नवी दिल्ली: स्टाफ सिलेक्शन कमिशननं संयुक्त पदवी परीक्षा 2019 च्या कौशल्य चाचणीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. संयुक्त पदवी परीक्षा 2019 च्या कौशल्य चाचणी परीक्षा 15 आणि 16 सप्टेंबर रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रावर होणार आहे. ssc.nic.in या वेबसाईटवर अधिकृत नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. कौशल्य चाचणी परीक्षेत विद्यार्थ्यांना तीन कौशल्यांची चाचणी द्यावी लागणार आहे. यामध्ये डाटा एंट्री स्पीड टेस्ट, पॉवर पॉईंट प्रेझेंटेंशन , आणि स्प्रेड शीट तयार करणे आणि प्रेझेंट करणे यासंदर्भातील चाचणी विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना कौशल्य चाचणी परीक्षेतून सूट देण्यात आली आहे ते स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या प्रादेशिक विभागांच्या अधिकृत वेबसाईटवर सूचना देण्यात आली आहे. ती पाहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

संयुक्त पदवी परीक्षा 2019 टियर 1 चं आयोजन 3 ते 9 मार्च 2020 या कालावधीत करण्यात आलं आहे. टियर 2 च्या परीक्षेचं आयोजन 15 ते 18 नोव्हेंबरला करण्यातक आलं होतं. तर टियर III चं आयोजन 22 नोव्हेंबर रोजी करण्यात आलं होतं. तर, तिसऱ्या टियरचा निकाल 26 जून रोजी जाहीर झाला होता.

सीजीएल 2020 टियर 1 च्या निकालाची तारीख जाहीर

स्टाफ सिलेक्शन कमिशननं कंबाइंड ग्रॅज्युएशन लेवल म्हणजेच सीजीएल 2020 च्या टीयर 1 च्या परीक्षांच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. एसएससीनं बुधवारी एक नोटिफिकेशन जारी करुन सीजीएल आणि सीएचएसएल परीक्षाचा निकाल 11 डिसेंबर रोजी जाहीर होणार असल्याची घोषणा केली आहे. सीजीएल परीक्षा 2020 टियर 1 चं आयोजन 13 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान करण्यात आलं आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून कंबाईंड ग्रॅज्युएशन लेवल सीजीएल 2020 च्या टीयर 1 परीक्षेची उत्तरतालिका जाहीर केली आहे. आयोगाकडून लवकरच अंतिम उत्तर तालिका जाहीर केली जाणार आहे. 11 डिसेंबरला टीयर 1 च्या निकालामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना टीयर 2 ची परीक्षा द्यावी, लागणार आहे.

6506 पदांसाठी भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशननं जारी केलेल्या नोटिफिकेशनुसार 13 ते 24 ऑगस्ट दरम्यान परीक्षेचं आयोजन केलं करण्यात आलं आहे आहे. एकूण 6506 पदांसाठी सीजीएल परीक्षा आयोजित करण्यात येत आहे. पहिल्या टीयर मधील उत्तीर्ण उमेदवार दुसऱ्या टीयरसाठी पात्र ठरतील.

परीक्षेचं स्वरुप

स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून सीजीएलच्या टियर 1 परिक्षेत 100 प्रश्न विचारले जातात. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं आयोजित कऱण्यात आली होती. यामध्ये चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग देखील केलं जातं. सामान्य ज्ञान, जनरल इंटेलिजन्स, इंग्रजी, गणितीय क्षमता यावर प्रश्न विचारले जातात. प्रत्येक विभागावर 25-25 प्रश्न विचारले जातात.

इतर बातम्या:

SSC CGL 2020 : स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून सीजीएल परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर, उत्तरतालिका प्रसिद्ध

SSC CGL Recruitment 2020: स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून सीजीएल टियर 1 परीक्षेच्या तारखा जाहीर, ऑगस्ट महिन्यात परीक्षा

SSC CGL 2019 Skill Test dates released on ssc nic in check notice here

'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.