SSC Constable GD 2021 Notification : जीडी कॉन्स्टेबल भरतीसाठीचं नवं नोटिफिकेशन जाहीर, 10 वी पास असणाऱ्यांना मोठी संधी

स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय निमलष्करी पोलीस दलांमध्ये कॉन्स्टेबल (SSC GD Constable Recruitment 2021) भरतीबाबत मे महिन्यात नवीन नोटिफिकेशन जारी केलं जाईल.

SSC Constable GD 2021 Notification : जीडी कॉन्स्टेबल भरतीसाठीचं नवं नोटिफिकेशन जाहीर, 10 वी पास असणाऱ्यांना मोठी संधी
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Apr 13, 2021 | 10:34 AM

नवी दिल्ली : कर्मचारी चयन आयोग म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून (SSC) केंद्रीय निमलष्करी पोलीस दलांमध्ये कॉन्स्टेबल (SSC GD Constable Recruitment 2021) भरती प्रक्रिया जाहीर केली जाणार आहे. सीमा सुरक्षा बल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF),इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस (ITBP), सशस्त सीमा बल (SSB),नॅशनल इनवेस्टिगेशन एजन्सी(NIA ) आणि सचिवालय सुरक्षा बल (SSF)आसाम रायफल्समधील भरती प्रक्रियेबाबत नोटिफिकेशन मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केली जाईल, अशी माहिती स्टाफ सिलेक्शन कमिशननं दिली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर याविषयी माहिती देण्यात आली आहे. या भरतीसाठी 2 ऑगस्ट ते 25 ऑगस्टला ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा होईल,अशी शक्यता आहे. (SSC GD constable recruitment 2021 SSC pass candidates can apply notification will release in first week of May)

10 वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी

स्टाफ सिलेक्शन कमिशननं जाहीर केलेल्या परीक्षांच्या कॅलेंडरनुसार 10 मेपर्यंत जीडी कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करता येणार आहेत. 10 वी उत्तीर्ण उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात. उमेदवारांची निवड कॉम्प्युटर आधारित टेस्ट, शारीरीक क्षमता, मेडिकल टेस्ट याच्या आधारावर केली जाणार आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशनचं अधिकृत नोटिफिकेशन पाहण्यासाठी क्लिक करा

निवड प्रक्रिया

स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून जीडी कॉन्स्टेबल पदासाठी 55915 जागांवर भरती प्रक्रिया होणार असल्याची माहिती आहे. त्यामध्ये 47582 जागा पुरुष उमेदवारांसाठी तर 8333 जागा महिला उमेदवारांसाठी ठेवण्यात आल्या असतील. 2018 मध्ये 60210 मध्ये पदांसाठी भरतीची जाहिरात देण्यात आली होती. त्याचा निकाल जानेवारी 2021 मध्ये जाहीर झाला होता. अर्ज करणाऱ्या उमेदवारांची प्रथम कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा घेतली जाईल. त्यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांची शारीरिक चाचणी घेतली जाईल. शारीरीक क्षमता चाचणी घेतल्यानंतर मेडिकल चाचणी घेण्यात येईल.

वयाची अट

जीडी कॉन्स्टेबल पदासाठी 21700-69100 इतक वेतन दिलं जाते. कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणं आवश्यक असून त्याचं वय 18 ते 23 च्या दरम्यान असणं आवश्यक आहे. ऑनलाईन परीक्षेमध्ये सामान्यज्ञान, गणित, हिंदी आणि इंग्रजी, तार्किक क्षमता याविषयी प्रश्न विचारले जातात. यासाठी खुल्या प्रवर्गासाठी 100 रुपये परीक्षा फी आहे. तर, महिला, एससी, एसटी आणि माजी सैनिकांसाठी कोणतीही फी नाही.

संबंधित बातम्या:

SSC Constable GD 2021 Notification : केंद्रीय निमलष्करी दलांमध्ये कॉन्स्टेबलपदावर 10 वी पास उमेदवारांना मोठी संधी, 69 हजार पगार

NIFT Recruitment 2021 : नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक पदांसाठी भरती, जाणून घ्या तपशील

India Post Jobs : दहावी पास उमेदवारांसाठी टपाल विभागात बंपर भरती, परीक्षेविना होणार नियुक्ती, जाणून घ्या संपूर्ण तपशील

(SSC GD constable recruitment 2021 SSC pass candidates can apply notification will release in first week of May)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.