SBI Exam Postponed: स्टेट बँक ऑफ इंडियाची भरती परीक्षा लांबणीवर, पुन्हा परीक्षा कधी होणार?
स्टेट बँक ऑफ इंडियाने मागील आठवड्यात फार्मासिस्ट पदासाठीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र जारी केले होते. State Bank of India

नवी दिल्ली: भारतातील आघाडीची बँक एक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने फार्मासिस्ट आणि डाटा ॲनालिस्ट पदासाठीच्या ऑनलाईन परीक्षेला स्थगिती दिली आहे. ही परीक्षा 23 मे रोजी होणार होती. मात्र, स्टेट बँकेने त्याविषयीचे नोटिफिकेशन जारी करून परीक्षा स्थगित केल्याचं सांगितलं आहे. भारतातील वाढती कोरोना बाधितांची रुग्ण संख्या पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. (State Bank of India postpone pharmacist and data analyst exam due to corona outbreak)
नवीन तारखांची घोषणा नाही
स्टेट बँक ऑफ इंडियाने मागील आठवड्यात फार्मासिस्ट पदासाठीच्या परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी केले होते. मात्र, संपूर्ण देशभरात वाढत असलेली कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेऊन स्टेट बँकेने परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केलाय. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून सध्यातरी परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार होती.
200 गुणांची परीक्षा
कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव लक्षात घेता स्टेट बँक ऑफ इंडियाने ही परीक्षा ऑनलाईन मोडद्वारे आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. ही परीक्षा एकूण 200 गुणांसाठी होती. यासाठी उमेदवारांना दोन तासांचा वेळ दिला जाणार होता. परीक्षेमध्ये जनरल इंग्लिश, गणित, तार्किक क्षमता, सामान्यज्ञान आणि व्यावसायिक क्षमता या पाच विषयांवर प्रश्न विचारले जाणार होते. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून या परीक्षेचा अभ्यासक्रम,गुणांची पद्धत देखील जाहीर करण्यात आली होती. सध्या ज्या उमेदवारांनी ज्या परीक्षेसाठी अर्ज दाखल केला असेल ते उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन नमुना प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून त्याचा अभ्यास करू शकतात.
नमुना प्रश्नपत्रिका
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या फार्मासिस्ट आणि डाटा अॅनालिस्ट या पदासाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला होता. ते विद्यार्थी स्टेट बँकेच्या ऑफिशिअल वेबसाईट वर जाऊन नमुना प्रश्नपत्रिका डाऊनलोड करू शकतात. नमुना प्रश्न पत्रिकेचा अभ्यास केल्यास, त्या सोडवल्यास मुख्य परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो.
नमुना प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
कोरोनामुळे राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुन्हा लांबणीवर https://t.co/5lgSMi5I9k #Exam #Education #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 19, 2021
संबंधित बातम्या
10 वी पासना उच्च न्यायालयात नोकरीची संधी; 1,73,200 रुपये मिळणार पगार
SBI Clerk Recruitment 2021: स्टेट बँकेत 5 हजार जागांवर भरती, अर्ज करण्याची मुदत वाढवली
(State Bank of India postpone pharmacist and data analyst exam due to corona outbreak)