स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत 408 जागांसाठी भरती, 35 हजारापर्यंत पगाराची संधी

राज्यातील स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2022 साठी सर्व नागरी स्थानिक स्वराज संस्थांमध्ये शहर समन्वयक पदासाठी कंत्राटी पद्धतीनं भरती करण्यात येणार आहे.

स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत 408 जागांसाठी भरती, 35 हजारापर्यंत पगाराची संधी
job
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 5:28 PM

मुंबई: महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी या प्रकल्पासाठी शहर समन्वयक पदासाठी अर्ज मागण्यात आले आहेत. राज्यातील स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2022 साठी सर्व नागरी स्थानिक स्वराज संस्थांमध्ये शहर समन्वयक पदासाठी कंत्राटी पद्धतीनं भरती करण्यात येणार आहे. एकूण 408 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

पात्रता

शहर समन्वयक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातील बी.ई., बी.टेक., बी.आर्क, बी. प्लानिंग आणि बी.एस.सी यापैकी कोणतीही पदवी असणं आवश्यक आहे. नागरी स्थानिक स्वराज संस्थेतील कामाचा किमान 6 महिन्यांचा अनुभव आवश्यक आहे.

अर्ज कुठे करायचा?

उमेदवारांनी https://ccjobs.smmurban.co.in या लिंकवर ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे. इतर कोणत्याही मार्गानं अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी एकच अर्ज सादर करावा, असं सांगण्यात आलं आहे.

मानधन

स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत भरण्यात येणाऱ्या शहर समन्वयक पदासाठी अमृत शहरे व गडचिरोली जिल्ह्यातील शहरांसाठी 35 हजार रुपये मानधन असेल. उर्वरित शहरांमध्ये काम करणाऱ्या शहर समन्वयक उमेदवारासाठी 30 हजार रुपये मानधन देण्यात येईल.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 21 नोव्हेंबर 2021 ही निश्चित करण्यात आली आहे. उमेदवार त्यांच्या पसंतीचा महसुली विभाग नमूद करु शकतात. उमेदवारांची निवड ऑनलाईन पद्धतीनं मुलाखत घेतल्यानंतर केली जाणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2022 पूर्ण होईपर्यंत या सेवा सुरु राहणार आहेत. उमेदवारांचं वय 35 वर्षांपेक्षा कमी असावं, अशी अट आहे.

इतर बातम्या:

जनतेनं भाजपच्या षडयंत्राला बळी पडू नये, पटोलेंचं आवाहन; भाजपकडून दंगलीचं राजकारण सुरु असल्याचाही आरोप

VIDEO: दुसऱ्या दिवशीही अमरावती धुमसतेय, बंदमध्ये जमावाचा धुडगूस; 5 व्हिडीओ, ज्यातून दिसतेय दंगलीची दाहकता

Swachh Maharashtra Abhiyan recruitment for 408 City Coordinator Post check details here

‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.