मुंबई : टाटा मेमोरिअल सेंटरच्या ( Tata Memorial Centre) ॲडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अँड एज्युकेशन (ACTREC) अंतर्गत भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. आवश्यकतेनुसार या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. वरिष्ठ संशोधन सहकारी, लॅब असिस्टंट या पदांसाठीच्या या जागा आहेत. 12 मे 2022 रोजी खाली दिलेल्या पत्त्यावर आपल्या CV आणि आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी (Interview) हजर राहायचं आहे. वरिष्ठ संशोधन सहकारी या पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराचं वय जास्तीत जास्त 35 असावं. लॅब असिस्टंट पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराचं जास्तीत वय 27 असावं. अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
एकूण जागा – आवश्यकतेनुसार
पदाचे नाव आणि वयाची अट
वरिष्ठ संशोधन सहकारी ( Senior Research Fellow) / कमाल वय – 35 वर्षे
प्रयोगशाळा परिचर (Lab Attendant) / कमाल वय – 27 वर्षे
अर्ज करायची पद्धत – ऑफलाईन
निवड करायची पद्धत – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 12 मे 2022
मुलाखतीचा रिपोर्टींग टाईम – 09.30 AM To 10.00 AM
मुलाखतीचा पत्ता – सेमिनार रूम, तिसरा मजला, खानोलकर शोधिक, ACTREC
अधिकृत वेबसाईट – http://www.actrec.gov.in/
जाहिरात – Click Here
टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाईटला भेट द्या