Railway Jobs 2023 : रेल्वेत करायचं करियरचं स्वप्न पूर्ण, असा करा अर्ज

Railway Jobs 2023 : भारतीय रेल्वे विभागात या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पदासाठी शैक्षणिक अर्हता काय आहे, पगार किती मिळेल, अर्ज कसा करायचा ही माहिती एका क्लिकवर मिळेल.

Railway Jobs 2023 : रेल्वेत करायचं करियरचं स्वप्न पूर्ण, असा करा अर्ज
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 3:29 PM

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. दक्षिण मध्य रेल्वेत या पदांसाठी ही भरती होणार आहे. त्यासाठी तुमच्याकडे तांत्रिक ज्ञान असणे आवश्यक आहे. दक्षिण मध्य रेल्वेने (South Central Railway Recruitment 2023) कनिष्ठ तंत्रज्ञान सहाय्यक (Junior Technical Associate) या पदासाठी ही भरती सुरु केली आहे. या पदांसाठी अर्ज करता येईल. योग्य उमेदवारांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या scr.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. ही अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 जून, 2023 पर्यंत आहे.

इतक्या पदांसाठी भरती दक्षिण मध्य रेल्वेने भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती दिली आहे. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन होईल. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. एकूण 35 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. कनिष्ठ तंत्रज्ञान सहाय्यक (Junior Technical Associate) या अंतर्गत ही भरती होईल.

  • सिव्हिल इंजिनिअरिंग – 19 पदे
  • इलेक्ट्रिकल(ड्रॉईंग)- 10 पदे
  • एस अँड टी(ड्रॉईंग)- 6 पदे

काय आहे पात्रता या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्जदारांकडे संबंधित विषयाची पदवी असावी. याशिवाय उमेदवारांकडे मॅकेनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ही पदविका, डिप्लोमा असावा. सर्वसाधारण गटातील उमेदवारांकडे 60 टक्के गुण असावेत. तर एससी आणि एसटी प्रवर्गासाठी 50 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

वयाची मर्यादा भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे त्यांच्या श्रेणीनुसार वय सुनिश्चित करण्यात आले आहे. सर्वसाधारण, ओपन गटातील उमेदवाराचं वय 18 ते 33 वर्षे असावे. तर ओबीसी प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 36 वर्षे, एससी/एसटीसाठी 38 वर्षे वयोगट आहे.

निवड होईल अशी या पदांसाठी उमेदवारांची निवड योग्यता, अनुभव आणि त्याच्या गुणांआधारे करण्यात येईल. त्यासाठीची प्रक्रिया संकेतस्थळावर मिळेल.

शुल्क लागले इतके सर्वसाधारण उमेदवारांना या पदासाठी अर्ज करताना 500/-रुपये शुल्क अदा करावे लागेल. तर एससी/एसटी/ओबीसी/महिला/अल्पसंख्यक/ईडब्ल्यूएस श्रेणी या उमेदवारांना अर्जासोबत 250 रुपयांचे शुल्क अदा करावे लागेल.

डिमांड ड्राफ्ट करा तयार FA आणि CAO/SCR/SC प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी आणि वरिष्ठ कार्मिक अधिकारी (अभियांत्रिकी), प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी कार्यालय, 4था मजला, कार्मिक विभाग, रेल निलयम दक्षिण मध्य रेल्वे, सिकंदराबाद, पिन- 500025 च्या सचिव यांच्या नावे डिमांड ड्राफ्ट तयार करावा लागेल. अधिक माहितीसाठी तुम्ही scr.indianrailways.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.