Aurangabad Jobs: आम्हाला राग येत नाही, नोकरी आली तरी आम्ही अर्ज भरत नाही, आम्ही थंड ! पेटून उठा, MGM विद्यापीठात जागा…
नोकरीचं ठिकाण औरंगाबाद आहे. 30 मे 2022 ही अर्ज करायची शेवटची तारीख आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीनं करायचा आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज करताना नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावं. अर्जात दिलेली आवश्यक कागदपत्रं प्रमाणपत्रं अपलोड करावीत.
औरंगाबाद : महात्मा गांधी मिशन विद्यापीठ (MGM University) औरंगाबाद (Aurangabad) अंतर्गत भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक (Professor) या पदांसाठीच्या या भरती आहेत. बीई/ बी.टेक & एम.ई / एम.टेक आणि पीएचडी असणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. नोकरीचं ठिकाण औरंगाबाद आहे. 30 मे 2022 ही अर्ज करायची शेवटची तारीख आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीनं करायचा आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज करताना नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावं. अर्जात दिलेली आवश्यक कागदपत्रं प्रमाणपत्रं अपलोड करावीत.
पदाचे नाव
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता
बीई/ बी.टेक & एम.ई / एम.टेक
सहाय्यक प्राध्यापक
बी.ई/ बी.टेक & एम.ई/ एम.टेक
इच्छुक उमेदवाराला २ वर्षाचा अनुभव असावा
सहयोगी प्राध्यापक
बीई/ बी.टेक & एमई/ एम.टेक , पी.एचडी
टीचिंग/ रिसर्च/ इंडस्ट्रीमध्ये ५ वर्षाचा अनुभव, पीएचडी केल्यानंतरचा २ वर्षाचा अनुभव हवा.
प्राध्यापक
प्राध्यापकाची शैक्षणिक पात्रता सहयोगी प्राध्यापकासारखीच असावी. कमीत कमी १० वर्षाचा टीचिंग/ रिसर्च/ इंडस्ट्रिअल क्षेत्रात अनुभव असावा
असा करा अर्ज
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीनं करायचा आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
सविस्तर सूचना अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत
उमेदवारांनी अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे/ प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2022 आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.
इतर माहिती
- नोकरीचं ठिकाण – औरंगाबाद
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मे 2022
MAHATRANSCO भरती प्रक्रिया
दरम्यान महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत 223 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अर्ज करायला फक्त 2 दिवस बाकी आहेत. 24 मे 2022 अर्ज करायची शेवटची तारीख आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीनं करायचा आहे. सहायक अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (दूरसंचार), सहायक अभियंता (स्थापत्य) या जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे केली जाणार आहे. ही परीक्षा जून किंवा जुलै महिन्यात होऊ शकते. अर्ज शुल्क आणि वयोमर्यादा खुल्या आणि राखीव प्रवर्गासाठी वेगवेगळी आहे. पदांनुसार शैक्षणिक पात्रता खाली दिलेली आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. अधिक माहितीसाठी इथे Click करा.