तब्बल 355 पदांसाठी बंपर भरती, आजच करा अर्ज आणि मिळवा थेट सरकारी नोकरी
355 पदांसाठी बंपर भरती सुरू झालीये. विविध पदांसाठी ही भरती आहे. विशेष म्हणजे थेट सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी काही नियम व अटी ठेवण्यात आल्या आहेत. ही भरती नेमकी कोणती आणि कधीपर्यंत अर्ज करू शकता, याबद्दल जाणून घ्या सविस्तरपणे
मुंबई : सरकारी नोकरी हवी आहे. मग चला आजच करा अर्ज आणि मिळवा थेट सरकारी नोकरी. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल 355 पदांसाठी सुरू आहे. मग उशीर कशाला करता थेट अधिकृत वेबसाइट odishafdc.com वर जा आणि करा अर्ज. विशेष म्हणजे ही भरती विविध पदांसाठी होतंय. 12 डिसेंबर 2023 पर्यंत तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. विशेष बाब म्हणजे वन विभागात तुम्हाला काम करण्याची ही सुवर्णसंधी नक्कीच आहे. तर मग आजच करा रिक्त पदासाठी अर्ज. 22 नोव्हेंबरपासून ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलीये. ग्रेड 2 आणि ग्रेड 3 अंतर्गत ही 355 पदांची भरती प्रक्रिया पार पडत आहे.
ओडिशा वन विभागाकडून ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेत अकाऊंट असिस्टेंट, असिस्टेंट, एग्जीक्यूटिव असिस्टेंट फील्ड, असिस्टेंट ग्रेड 2 आणि ग्रेड 3 साठी भरती आहे. या पदासाठी अर्ज करण्याची अत्यंत सोपी अशी प्रक्रिया आहे. देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून ऑनलाइन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. शेवटची तारीख लक्षात ठेवा आणि फटाफट करा अर्ज.
या 355 रिक्त पदांसाठी अर्ज करण्यासाठी काही नियम आणि अटी आहेत. तसेच वयोमर्यादा ही सर्वात महत्वाची आहे. 200 ते 500 रूपये या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसंदर्भात अजून काही गोष्टी माहिती करून घेण्यासाठी तुम्ही थेट अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. तिथे तुम्हाला सविस्तरपणे माहिती मिळेल.
मुळात म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने त्याचे वेतन देखील पदानुसार असणार आहे. प्रत्येक पदासाठी वेगवेगळे वेतन निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय इतर अनेक प्रकारच्या सरकारी भत्त्यांचा फायदा देखील तुम्हाला मिळणार आहे. अकाऊंट असिस्टेंट, असिस्टेंट या पदांना इतर पदापेक्षा अधिक वेतन मिळणार आहे.
अकाउंट्स असिस्टेंट ग्रेड 2 या पदासाठी उमेदवाराचे वय हे कमीत कमी 21 वर्षे असले पाहिजे आणि जास्तीत जास्त 38 वर्षे असले पाहिजे ही सर्वात मोठी अट ठेवण्यात आलीये. दुसरी अट म्हणजे अकाऊंटिंकचा किमान दोन वर्षांचा अनुभव हा असायला पाहिजे. असिस्टेंट ग्रेड 3 पदासाठी देखील कमीत कमी 21 आणि जास्तीत जास्त 38 वर्षे वय असायला पाहिजे ही महत्वाची अट आहे.
या पदांसाठी एक परीक्षा ही वन विभागाकडून घेतली जाणार आहे. या परीक्षेत तब्बल 200 प्रश्न हे विचारले जातील. यासंदर्भातील अपडेट वर दिलेल्या वेबसाइटवर दिले जातील. अजून परीक्षेची तारीख ही जाहिर करण्यात नाही आली. उमेदवारांना अभ्यास करण्यासाठी चांगला वेळ विभागाकडून देण्यात आला आहे.