जिल्हा आरोग्य विभागात भरती, परीक्षेचे नो टेन्शन, या पद्धतीने होणार थेट उमेदवाराची निवड
या जिल्हाच्या आरोग्य विभागामध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा न देताही उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे. मग इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. ही मोठी संधी आहे.
मुंबई : नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याची गरज उमेदवारांना नाहीये. मग उशीर न करता इच्छुकांनी या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया जिल्हा प्रशासन परभणी यांच्याकडून राबवली जातंय. वैद्यकीय अधिकारी पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. ही मोठी संधी नक्की म्हणावी लागणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी एमबीबीएस आणि पी.जी आणि पदवीधर उमेदवार हे अर्ज करू शकतात. मुलाखत ही आॅफलाईन पद्धतीने पार पडणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे जास्तीत जास्त वय हे 58 असावे. या भरती प्रक्रियेसाठी 28 डिसेंबर 2023 ला मुलाखत घेतली जाणार आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे उपस्थित राहवे लागेल.
मुलाखतीसाठी उमेदवारांना सकाळी दहा वाजता उपस्थित राहवे लागेल. उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी 28 डिसेंबर 2023 ला तुम्हाला उपस्थित राहवे लागणार आहे. उशीरा आलेल्या उमेदवारांना ग्राह्य धरले जाणार नाहीये.
नोकरीचे ठिकाण हे परभणी असणार आहे. तसेच मुलाखतीला येताना उमेदवारांना आपली महत्वाची कागदपत्रे देखील आणावी लागणार आहेत. मुलाखतीला जाण्याच्या अगोदर उमेदवारांनी जाहिरात ही व्यवस्थितपणे वाचावी. तुमचे जर शिक्षण वैद्यकीय विषयात झाले असेल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. लगेचच यासाठी अर्ज करा.
गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय विभागामध्ये मोठी मेगा भरती सुरू आहे. आता थेट परभणी येथे देखील ही भरती सुरू आहे. विशेष बाब म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी द्यावी लागणार नाहीये. थेट मुलाखतीतूनच उमेदवाराची निवड होईल. या भरती प्रक्रियेबद्दलचे इतर सर्व अपडेट हे तुम्हाला साईटवर बघायला मिळतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.