बांधकाम कामगारांना थेट परदेशात रोजगाराची संधी, 1 ते 2 लाख रुपये पगार; राज्य सरकारची सर्वात मोठी घोषणा

बांधकाम कामगारांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट विदेशात काम करण्याची संधी बांधकाम कामगारांना मिळाली आहे. विशेष म्हणजे तगडी पगार देखील कामगारांना देण्यात येणार आहे. 1 लाख 40 हजार ते 2 लाखांपर्यंत पगार कामगारांना मिळणार आहे. चला तर मग जाणून ध्या याबद्दल अधिक माहिती.

बांधकाम कामगारांना थेट परदेशात रोजगाराची संधी, 1 ते 2 लाख रुपये पगार; राज्य सरकारची सर्वात मोठी घोषणा
Follow us
| Updated on: Jan 03, 2024 | 6:48 PM

विनायक डावरुंग, मुंबई : बांधकाम कामगारांना इस्राईलमध्ये मोठी रोजगाराची संधी आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही घोषणा केलीये. शासनाकडून बांधकाम कामगारांना संपूर्ण मार्गदर्शन केले जाणार आहे. जिल्हास्तरावर जिल्हा कौशल्य, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे इच्छुकांनी संपर्क साधणे आवश्यक आहे. मंत्री लोढा यांनी बांधकाम कामगारांना आवाहन केले आहे. फ्रेमवर्क, शटरिंग कारपेंटर, बार बेंडिंग मेसन, सिरेमिक टाइलिंग मेसन, प्लास्टरिंग मेसन या ट्रेडसाठी अर्ज करावा लागणार आहे. विशेष म्हणजे एकदम मोठा पगार उमेदवारांना मिळणार आहे.

या नोकरीतून प्रत्येक कामगाराला महिन्याला 1 लाख 40 हजार ते 2 लाखांपर्यंत पगार हा मिळणार आहे. 25 ते 45 वर्षे वयोगटातील कामगार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. खरोखरच ही एक मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही ठेवण्यात आलीये. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान दहावीपर्यंत शिक्षण असणे आवश्यक आहे.

दहावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. कामगाराला किमान एक वर्षे ते कमाल पाच वर्षांच्या नोकरीसाठी अनिवार्य करारावर स्वाक्षरी करावी लागेल. तसेच कामाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असावा. त्याचप्रमाणे यापूर्वी त्या उमेदवाराने इस्राईलमध्ये नोकरी केली नसावी, ही सर्वात मोठी आणि अत्यंत महत्वाची अट या भरती प्रक्रियेसाठी ठेवण्यात आलीये.

फक्त अर्जदार नाही तर त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने यापूर्वी इस्राईलमध्ये काम केलेले नसावे. यासाठी उमेदवाराने https://rojgar.mahaswayam.gov.in/#/mic या संकेतस्थळावर भेट द्यावी. तिथेच सर्व माहितीही आरामात मिळेल. तसेच आपण 8291662920 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकता. असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून करण्यात आले आहे.

शासनाकडून बांधकाम कामगारांसाठी ही सुवर्णसंधी आणली आहे. विशेष म्हणजे शासनाकडून सर्व मदत ही कामगारांना करण्यात येणार आहे. खरोखरच बांधकाम कामगारांसाठी ही संधी आहे. https://rojgar.mahaswayam.gov.in/#/mic या साईटवर आपल्याला याबद्दल सर्व माहिती ही मिळणार आहे. तसेच एक मोबाईल क्रमांक देखील अर्जदारांच्या मदतीसाठी देण्यात आलाय.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.