Salary Increment : यंदा खिशात खुळखुळणार पैसा! कंपन्या वाढविणार सॅलरी, इतकी होणार पगार वाढ
Salary Increment : जागतिक पातळीवर अस्थिरता असली तरी यंदा भारतीयांच्या पगारात घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. विविध क्षेत्रातील कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ करु शकतात. त्यामुळे यंदा कर्मचाऱ्यांची बल्ले बल्ले होणार आहे.
नवी दिल्ली : आर्थिक वर्ष लवकरच संपणार आहे आणि कंपन्यांनी पगार वाढीची प्रक्रिया (Increment Process) सुरु केली आहे. जागतिक पातळीवर अस्थिरता असली तरी यंदा भारतीयांच्या पगारात घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. विविध क्षेत्रातील कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ करु शकतात. त्यामुळे यंदा कर्मचाऱ्यांची बल्ले बल्ले होणार आहे. आता कर्मचाऱ्यांना प्रश्न पडला असेल की, त्यांच्या पगारात (Salary) किती वाढ होईल? काही एजन्सीज दरवर्षी अनेक कंपन्यांमध्ये सर्व्हे करतात. त्याआधारे कोणत्या क्षेत्रातील कंपन्या किती पगारवाढ करणार आहेत याचा अंदाज बांधण्यात येतो. व्यावसायिक सेवा देणारी संस्था एओन इंडियाने (Aon India) याविषयीचा अंदाज वर्तविला आहे. त्यांच्या मते, यंदा भारतीय कंपन्या सरासरी 10.3 टक्क्यांची पगारवाढ देतील. जागतिक मंदीचे कारण असले तरी भारतीयांना चांगले इन्क्रिमेंट मिळेल. कोणत्याही परिस्थितीत कंपन्या ब्रेन ड्रेन होणार नाही, चांगले कर्मचारी पगारासाठी दुसरीकडे जाणार नाहीत, याची काळजी घेतली.
काही कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची 21.4 टक्के पळवापळी झाली आहे. टॅलेंट स्ट्रॅटेजीमध्ये मोठा बदल झाला आहे. पुरवठा साखळीत तफावत यामुळे कंपन्यांनी दुहेरी अंकी वेतनवाढ केली आहे. त्यामुळे कंपन्यांमध्ये दोन अंकी पगारवाढ होईल, असा दावा एओन इंडियाने केला आहे.
वाढती आर्थिक अनिश्चितता, आर्थिक अस्थिरता यामुळे गेल्या दोन वर्षांपासून पगारवाढीचा मुद्दा ऐरणीवर नव्हता. यंदाही या बाबींचा इन्क्रिमेंटवर परिणाम होईल. अशा ही परिस्थितीत मागील दोन वर्षांत भारतीय कंपन्यांनी चांगली पगार वाढ दिली होती. तर काही कंपन्यांना वाढत्या खर्चाला आळा घालायचा होता. वर्ष 2020 आणि 2021 मध्ये कोरोना महामारीमुळे पगार वाढ देण्यात आली नाही.
एओन रिपोर्टनुसार, जवळपास 46 टक्के भारतीय कंपन्या कर्मचाऱ्यांना दोन अंकी पगार वाढ देण्याच्या तयारीत आहेत. 2022 मध्ये कंपन्या सरासरी 10.6 टक्के पगारवाढ देण्यात आली होती. त्यामुळे कर्मचारी जाम खूश झाले होते. यंदाही कर्मचाऱ्यांना जोरदार वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. महागाईशी सामना करण्यासाठी ही रक्कम बुस्टर डोस ठरणार आहे. त्यामुळे महागाईपासून सूटकेसाठी ही पगारवाढ फायद्याची ठरणार आहे.
एओनने या अभ्यासासाठी 40 क्षेत्रातील जवळपास 1400 कंपन्यांच्या आकड्यांचे विश्लेषण केले. एचआर आणि व्यवस्थापनातील दिग्गजांशी, तज्ज्ञांशी चर्चा केली. सर्व्हेनुसार, टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म्स आणि प्रोडक्टस तयार करणाऱ्या कंपन्या यावर्षी सरासरी 10.9 टक्के इन्क्रिमेंट करतील. कुशल मनुष्यबळ टिकवून ठेवण्यावर कंपन्या जोर देत आहेत. तसेच त्यांना कर्मचारी प्रतिस्पर्धी कंपन्यांकडे जाऊ द्यायचे नाहीत.
तर काही कंपन्यांनी इन्क्रिमेंटच्या पंरपरेला फाटा दिला आहे. फ्लिपकार्टसह काही कर्मचाऱ्यांना पगार वाढीला यंदा नकारघंटा दिली आहे. तर काही कंपन्यांनी मोठी पगारवाढ न देता मध्यममार्ग निवडला आहे. या कंपन्या इतर सोयी-सुविधा वाढविण्यावर भर देत आहेत.