‘या’ महानगरपालिकेत मेगा भरती, परीक्षेचे नो टेन्शन, थेट मुलाखतीमधून होणार उमेदवाराची निवड, मोठी संधी
जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी बातमी तुमच्यासाठी आहे. नुकताच भरती प्रक्रिया सुरू झालीये. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याचे टेन्शन नाहीये.
मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला कोणत्याही प्रकारची परीक्षा ही द्यावी लागणार नाहीये. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. थेट मुलाखतीच्या माध्यमातूनच उमेदवाराची निवड ही केली जाईल. या भरती प्रक्रियेतून तब्बल 118 पदे भरली जाणार आहेत. चला तर मग फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.
विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया ठाणे महानगरपालिकेकडून राबवली जातंय. ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याची ही मोठी संधी आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारी लागावे. उमेदवारांना कोणत्याही पद्धतीचा अर्ज न करता या भरती प्रक्रियेच्या मुलाखतीसाठी पोहचावे लागेल.
ठाणे महानगगपालिकेकडून ही भरती प्रक्रिया महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेसाठी केली जातंय. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 15 ते 19 जानेवारी 2024 पर्यंत मुलाखतीसाठी उपस्थित राहवे लागेल. मुलाखतीमधूनच थेट उमेदवाराची निवड केली जाईल.
ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. यामुळे शिक्षणाची अट देखील पदानुसार ठरवण्यात आलीये. उमेदवारांना या भरती प्रक्रियेच्या मुलाखतीसाठी अरविंद कृष्णजी पेंडसे सभागृह, प्रशासकीय भवन पाचपाखाड, ठाणे येथे उपस्थित राहवे लागणार आहे. या भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही पालिकेच्या वेबसाईटला भेट देऊ शकता तिथे तुम्हाला सर्व माहिती ही आरामात मिळेल.
या भरती प्रक्रियेतून ईसीजी टेक्निशियन, पल्मोनरी लॅब टेक्निशियन, ऑडिओमेट्री टेक्निशियन, वॉर्ड क्लर्क, अल्ट्रा सोनोग्राफी, क्ष किरण तंत्रज्ञ, ऑडीओकिन्युजल टेक्निशियन, सहायक क्ष किरण तंत्रज्ञ, मशीन तंत्रज्ञ, दंत तंत्रज्ञ, ज्युनिअर टेक्निशियन, सिनिअर टेक्निशियन, ई.ई.जी. टेक्निशियन, ब्लड बैंक टेक्निशियन, प्रोस्टेटिक व ऑयोटिक टेक्निशियन, एंडोस्कोपी टेक्निशियन याप्रमाणे 118 पदे भरली जाणार आहेत.