Government Jobs : आत्मनिर्भर व्हायचं ! परीक्षा द्यायची, जागा मिळवायची ! 70 रिक्त जागा आहेत, सविस्तर माहिती एका क्लिकवर
अर्ज ऑनलाइन पद्धतीनं करायचा आहे. अर्ज ऑनलाइन भरून झाल्यानंतर त्याची हार्ड कॉपी 15 जूनपर्यंत पाठवायची आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. पदांनुसार शैक्षणिक पात्रता, निवड पद्धती या संदर्भातली माहिती खाली दिलेल्या जाहिरातीत उपलब्ध आहे.
सीएसआयआर-सेंट्रल ग्लास आणि सिरॅमिक रिसर्च इन्स्टिट्यूट (CSIR-CGCRI) यांच्याकडून टेक्निशियन (Technician) आणि टेक्निकल असिस्टंट (Technical Assitant) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. या सूचनेनुसार तंत्रज्ञ आणि तांत्रिक सहाय्यकांच्या एकूण 70 जागा रिक्त आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीनं करायचा आहे. अर्ज ऑनलाइन भरून झाल्यानंतर त्याची हार्ड कॉपी 15 जूनपर्यंत पाठवायची आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. पदांनुसार शैक्षणिक पात्रता, निवड पद्धती या संदर्भातली माहिती खाली दिलेल्या जाहिरातीत उपलब्ध आहे.
अर्जाची हार्ड कॉपी या पत्त्यावर पाठवावी
CSIR- Central Glass & Ceramic Research Institute 196, Raja S.C.Mullick Road, Kolkata- 700032
महत्वाची तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मे 2022 अर्जाची हार्ड कॉपी सादर करण्याची शेवटची तारीख : 15 जून 2022
शैक्षणिक पात्रता
- टेक्निशियन- विज्ञान विषयातून दहावी किमान 55% गुणांसह उत्तीर्ण झालेली असावी. तसेच, संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- टेक्निकल असिस्टंट- इंजिनीअरिंगच्या संबंधित ट्रेडमध्ये किमान तीन वर्षांचा पूर्णवेळ डिप्लोमा 60% गुणांसह केलेला असावा. संबंधित क्षेत्रातील दोन वर्षांचा अनुभवही आवश्यक आहे. अर्ज कसा करावा
अधिकृत वेबसाईट – Click Here
जाहिरात – Click Here
या भरतीसाठी www.cgcri.res.in अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करा. यानंतर सादर केलेल्या अर्जाची हार्ड कॉपी आणि आवश्यक कागदपत्रे वरील पत्त्यावर १५ जूनपर्यंत पाठवा.