Tour of Duty: लष्कर भरतीचे नियम बदलणार, निवृत्तीची वर्षही ठरणार, आर्मी आणखी यंग होणार
लष्करातील भरतीमध्ये सध्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले जाणार आहेत. यामध्ये देशातील नागरिक तीन वर्षांसाठी भारतीय लष्करात भरती होणार असल्याची चर्चा सुरू होती. आता चार वर्षांच्या कंत्राटी सेवेनंतर या सैनिकांच्या भरतीच्या तारखेपासून सुमारे 30 दिवसांचा कालावधी असताना त्यापैकी 25 टक्के सैनिकांना परत बोलावण्यात येईल आणि ते नवीन तारखेसह सैनिक म्हणून रुजू होऊ शकतात.
मुंबई : लष्करी स्तरावरील भरती (Army recruitment) प्रक्रियेत मोठा बदल होण्याचे संकेत आहेत. आता हवाई दल आणि नौदलातील सैनिकांची सर्व भरती टूर ऑफ ड्यूटी अंतर्गत होईल. लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सेवांमध्ये भरतीच्या नवीन प्रणालीमध्ये काही बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत. रिपोर्ट्सनुसार, टूर ऑफ ड्यूटीच्या (Tour of Duty) अंतिम निर्णयावर बरीच चर्चा झाली आहे आणि काही नवीन सूचना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. लवकरच यासंदर्भातील घोषणा देखील केली जाऊ शकते. विशेष म्हणजे नवीन भरती प्रक्रियेची घोषणा (Announcement) कधीही केली जाऊ शकते.
लष्करातील भरतीमध्ये मोठे बदल
लष्करातील भरतीमध्ये सध्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले जाणार आहेत. यामध्ये देशातील नागरिक तीन वर्षांसाठी भारतीय लष्करात भरती होणार असल्याची चर्चा सुरू होती. आता चार वर्षांच्या कंत्राटी सेवेनंतर या सैनिकांच्या भरतीच्या तारखेपासून सुमारे 30 दिवसांचा कालावधी असताना त्यापैकी 25 टक्के सैनिकांना परत बोलावण्यात येईल आणि ते नवीन तारखेसह सैनिक म्हणून रुजू होऊ शकतात.
पगार व निवृत्ती वेतन निश्चिती
पगार व निवृत्ती वेतन निश्चितीसाठी मागील 4 वर्षांची कंत्राटी सेवा त्याच्या पूर्ण सेवेत घेतली जाणार नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात बचत होणे साहजिकच आहे. तिन्ही सेवेतील सैनिकांच्या काही ट्रेड्स याला अपवाद असतील, ज्यात तांत्रिक स्वरूपामुळे त्यांना 4 वर्षांच्या कंत्राटी सेवेच्या नंतरही आपली सेवा देता येणार आहे. यामध्ये आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही असणार असल्याचे सांगितले जात आहे. रिपोर्टनुसार लष्करी स्तरावरील भरती प्रक्रियेचा निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे.
25 टक्के पूर्ण मुदतीसाठी राखून ठेवण्याची शक्यता
तांत्रिकदृष्ट्या प्रशिक्षित मनुष्यबळाची थेट औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून भरती करावी, जेणेकरून त्यांच्या तांत्रिक प्रशिक्षणावर जास्त वेळ जाणार नाही, असा प्रस्तावही पुढे आला आहे. या संदर्भात अभ्यास करण्याचे काम आर्मी ट्रेनिंग कमांडला देण्यात आले होते, मात्र, अजून यावर नेमका कोणता निर्णय झाला हे समजू शकले नाहीये. टूर ऑफ ड्युटी संदर्भात बरीच चर्चा झाली आहे आणि अजूनही सुरू आहे. काही नवीन सूचना यामध्ये घेण्यात देखील आल्या आहेत. प्रशिक्षणासह तीन वर्षांच्या सेवेनंतर काही टक्के भरती केल्या जातील आणि आणखी 25 टक्के पूर्ण मुदतीसाठी राखून ठेवून आणखी पाच वर्षांच्या कंत्राटी सेवेनंतर सोडले जातील या प्राथमिक प्रस्तावाच्या विरोधात, नवीन प्रस्तावाची कल्पना आहे.