UPSC CSE Mains 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा 2022 ची तारीख जाहीर! परीक्षा सप्टेंबरमध्ये, पहा वेळापत्रक
या बातमीत पुढील दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण UPSC मुख्य 2022 वेळापत्रक डाउनलोड करू शकता. यापूर्वी आयोगाने UPSC प्रिलिम्स निकाल 2022 जूनमध्ये प्रसिद्ध केला होता.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा 2022 ची तारीख जाहीर झाली आहे. UPSC ने त्यांच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर या संदर्भात नोटीस जारी केली आहे. असे सांगण्यात आले आहे की UPSC CSE 2022 ची मुख्य परीक्षा सप्टेंबर 2022 मध्ये घेतली जाईल. UPSC परीक्षेचे 2022 चे संपूर्ण वेळापत्रक वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या बातमीत पुढील दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण UPSC मुख्य 2022 वेळापत्रक डाउनलोड करू शकता. यापूर्वी आयोगाने UPSC प्रिलिम्स निकाल 2022 जूनमध्ये प्रसिद्ध केला होता.
UPSC प्रिलिम्स 2022 उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेला बसू शकतात. UPSC ने निर्धारित वेळापत्रकानुसार नागरी सेवा मुख्य परीक्षा 2022 ही 16, 17, 18, 24 आणि 25 सप्टेंबर 2022 रोजी घेतली जाईल. परीक्षा दररोज दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. पहिली शिफ्ट सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत असेल. दुसऱ्या शिफ्टची परीक्षा दुपारी २ ते ५ या वेळेत होईल.
UPSC मुख्य परीक्षेची तारीख 2022
- पहिले सत्र (9 ते 12)/ दुसरे सत्र (2 ते 5)
- 16 सप्टेंबर 2022 – पहिले सत्र (9 ते 12) पेपर 1 (निबंध) – ———-
- 17 सप्टेंबर 2022 – पहिले सत्र (9 ते 12) पेपर 2 (सामान्य अध्ययन १)- दुसरे सत्र (2 ते 5) पेपर 3 (सामान्य अध्ययन २)
- 18 सप्टेंबर 2022 – पहिले सत्र (9 ते 12) पेपर 4 (सामान्य अध्ययन ३) – दुसरे सत्र (2 ते 5) पेपर 5 (सामान्य अध्ययन ४)
- 24 सप्टेंबर 2022 – पहिले सत्र (9 ते 12) पेपर ए (भारतीय भाषा)- दुसरे सत्र (2 ते 5) पेपर बी (इंग्रजी)
- 25 सप्टेंबर 2022 – पहिले सत्र (9 ते 12) पेपर 6 (वैकल्पिक विषय पेपर 1) – दुसरे सत्र (2 ते 5) पेपर 6 (वैकल्पिक विषय पेपर 2)
UPSC नागरी सेवा मुख्य 2022 वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.
UPSC मुख्य प्रवेशपत्र कधी येईल?
UPSC ने 22 जून 2022 रोजी नागरी सेवा प्राथमिक परीक्षा 2022 चा निकाल जाहीर केला होता. त्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी UPSC मुख्य 2022 फॉर्म जारी करण्यात आला. ज्या उमेदवारांनी अर्ज केला होता त्यांना UPSC मुख्य 2022 प्रवेशपत्र ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जारी केले जाईल. तुम्ही तुमचे UPSC प्रवेशपत्र upsc.gov.in वरून डाउनलोड करू शकाल.