AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यूपीएससी सक्सेस स्टोरी: पहिल्याच प्रयत्नात थर्ड रँक, जाणून घ्या अनन्याच्या यशाची गोष्ट

यूपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात थर्ड रँक मिळवून एक आयएएस अधिकारी बनलेल्या डोनूरु अनन्या रेड्डी यांचे शिक्षण कुठून झाले, कसे झाले व त्यांचे प्रेरणास्थान कोण होते हे जाणून घ्या….

यूपीएससी सक्सेस स्टोरी: पहिल्याच प्रयत्नात थर्ड रँक, जाणून घ्या अनन्याच्या यशाची गोष्ट
Follow us
| Updated on: Mar 28, 2025 | 7:50 AM

तेलंगणाच्या आयएएस अधिकारी डोनुरु अनन्या रेड्डी यांना विराट कोहली यांच्याकडून प्रेरणा मिळाली आणि त्यांनी यूपीएससी परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात थर्ड रँक मिळवली. अनन्या यांना यूपीएससी परीक्षेमध्ये एकूण 1065 मार्क्स मिळाले होते. ज्यापैकी लेखी परीक्षेमध्ये एकूण 875 मार्क्स मिळाले असून इंटरव्यूमध्ये (पर्सनॅलिटी टेस्ट) मध्ये 190 मार्क्स मिळवले.

यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षेमध्ये दरवर्षी हजारो मुले सहभागी होतात पण त्यांच्यापैकी फक्त काही असे असतात, जे इंटरव्यू नंतर शेवटच्या फेरीत निवडूक उमेदवारांच्या यादीत आपली जागा मिळवतात. या कारणामुळेच ही परीक्षा जगातील सर्वात कठीण परीक्षांमधील एक परीक्षा मानली जाते. यूपीएससी परीक्षा पास करणारे आयएएस-आयपीएस असे सांगतात की यामध्ये यशस्वी होण्यासाठी अभ्यासासोबतच चिकाटी आणि जबाबदारीची गरज असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिला आयएएस अधिकारी यांच्या बद्दल सांगणार आहोत ज्या अशाच चिकाटी आणि जबाबदारीचे असे एक उदाहरण बनल्या आहेत. या आयएएस अधिकाऱ्याचे नाव डोनुरु अनन्या रेड्डी असे आहे.

डोनुरु अनन्या रेड्डी तेलंगणाच्या महबूबनगर येथील रहिवासी आहेत. यूपीएससी सिविल सेवा परीक्षा 2023 मध्ये त्यांनी ऑल इंडिया तिसरी रँक मिळवली होती. त्यांनी दोन वर्ष खूप कठीण प्रयत्न करून यूपीएससी परीक्षेची तयारी केली होती, ज्याचा निकाल हा काही असा आला की त्यांनी त्यांच्या पहिल्या प्रयत्नातच थर्ड रँक मिळवून त्या आयएएस अधिकारी बनल्या.

अनन्या रेड्डी यांनी कुठून शिक्षणाची सुरुवात केली?

अनन्या रेड्डी यांनी दिल्लीच्या मिरांडा हाऊस मधून त्यांचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले. रेड्डी यांनी भूगोल विषयातून ग्रॅज्युएशन पूर्ण केले पण त्यांना इकॉनॉमिक्स विषयाचेही उत्तम ज्ञान होते. सर्वात जास्त आश्चर्याची गोष्ट म्हणजे रेड्डी यांनी भूगोल मधून ग्रॅज्युएशन करून व इकॉनॉमिक्स विषयाचे उत्तम ज्ञान असूनही त्यांनी या विषयांना सोडून मानवशास्त्र विषयाला पर्यायी विषय म्हणून निवडले. दिल्लीमध्ये यूपीएससी परीक्षेची तयारी करत असताना त्या भाड्याच्या एका घरात राहत होत्या. याच काळात त्या कोचिंग सुद्धा करत होत्या. तरी त्यांनी स्वअभ्यासावर जास्त भर दिला होता. त्या रोज 12 ते 14 तास अभ्यास करत होत्या आणि जशी परीक्षा जवळ आली तशा त्या अजूनही उशिरापर्यंत अभ्यास करू लागल्या होत्या.

अनन्या रेड्डी असे सांगतात की त्यांच्यासाठी विराट कोहली हे प्रेरणास्त्रोत होते.

अनन्या रेड्डी या क्रिकेटर विराट कोहली यांना आपले सर्वात मोठे प्रेरणास्त्रोत मानतात. त्यांनी एका इंटरव्यूमध्ये सांगितले होते की ‘विराट कोहली माझे आवडते खेळाडू आहेत आणि मला असे वाटते की त्यांच्यामध्ये एका प्रकारची प्रेरणा आणि कधी हार न मानण्याची जिद्द आहे. विराट कोहली यांची शिस्त आणि खेळ हा माझ्यासाठी एक प्रेरणास्त्रोत आहे.’ त्या सांगतात की त्यांची यूपीएससीचा अभ्यास समतोलात ठेवण्यासाठी त्या पुस्तके वाचायच्या आणि क्रिकेट पाहायच्या.

पश्चिम रेल्वेने प्रवास करताय?आज 4 तास मेगाब्लॉक, कोणत्या वेळात असणार?
पश्चिम रेल्वेने प्रवास करताय?आज 4 तास मेगाब्लॉक, कोणत्या वेळात असणार?.
मुंबईकरांनो.... या रविवारी लोकलने बिनधास्त फिरा, कारण मध्य रेल्वेवर...
मुंबईकरांनो.... या रविवारी लोकलने बिनधास्त फिरा, कारण मध्य रेल्वेवर....
लाडक्या बहिणींनो... 2100 रूपये मिळणार पण...उदय सामंत बघा काय म्हणाले?
लाडक्या बहिणींनो... 2100 रूपये मिळणार पण...उदय सामंत बघा काय म्हणाले?.
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....