देशाच्या आर्थिक राजधानीत पोलिसांचा तुटवडा, हैराण करणारा आकडा पुढे, तब्बल इतकी पदे रिक्त, भरतीबाबत…
नुकताच एक हैराण करणारी माहिती पुढे आलीये. विशेष म्हणजे थेट मुंबईमध्ये पोलिसांचा मोठी तुटवडा असल्याचे पुढे आलंय. विशेष म्हणजे विविध विभागांमध्ये रिक्त पदे आहेत. रिक्त पदांसाठी आकडा ऐकून तुम्हाला देखील नक्कीच धक्का बसल्याशिवाय राहणार नाहीये.

मुंबई : नुकताच एक हैराण करणारी आणि धक्कादायक माहिती ही पुढे आलीये. थेट देशाच्या आर्थिक राजधानीत पोलिसांचा तुटवडा असल्याची माहिती पुढे आलीये. थेट 12 हजारांपेक्षाही अधिक पदे ही पोलिसांची रिक्त आहेत. यामुळे यंत्रणेवर ताण येत असल्याचे स्पष्ट आहे. मुंबई पोलिस दलात मनुष्यबळाचा तुटवडा भासत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे पोलिसांची विविध पदे ही रिक्त आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या ही शिपाई या पदांची आहे.
देशाच्या आर्थिक राजधानीत पोलिसांचा मोठा तुटवडा असल्याचे आता स्पष्ट झालंय. सध्या अपर पोलिस आयुक्तपदापासून ते शिपाईपदापर्यंत तब्बल 12 हजार 899 पदे ही रिक्त असल्याची हैराण करणारी माहिती ही पुढे आलीये. यामुळे याचा ताण आहे त्या यंत्रणेवर पडत असल्याचे स्पष्ट आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पोलिस आयुक्त कार्यालयाकडे अर्ज करून मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदांची माहिती विचारली होती, त्यातून ही धक्कादायक माहिती पुढे आलीये. मुंबई पोलिस आयुक्तालयाचे सहायक पोलिस आयुक्त विनोद कांबळे यांनी 30 नोव्हेंबर 2023 पर्यंतची माहिती दिली आहे.
यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलंय की, तब्बल 12 हजार 899 पदे ही रिक्त आहेत. मुंबई पोलिस दलात एकूण मंजूर पदांची संख्या 51,308 आहे. यात 38,409 कार्यरत पदे असून 12,899 एकून पदे रिक्त आहेत. पोलिस शिपायाची 28,938 पदे मंजूर आहेत. यापैकी 17,823 कार्यरत पदे असून 11,115 एकून रिक्त पदे आहेत.
पोलिस उपनिरीक्षकाची 3,543 पदे मंजूर असताना फक्त 2,318 कार्यरत पदे असून 1,225 पदे रिक्त आहेत. पोलिस निरीक्षकाची 1,090 मंजूर पदे असून यापैकी 313 पदे रिक्त आहेत. ही खरोखरच एक हैराण करणारी माहिती नक्कीच म्हणावी लागणार आहे. अनेक पदे ही रिक्त आहेत. भरती प्रक्रिया कधी होणार हा प्रश्न सातत्याने विचारला जातो.