Ph.D : ‘पीएचडी’ वाल्यांसाठी नोकरी ! परीक्षा द्यावी लागणार नाही, 5 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख, ‘या’ पत्त्यावर अर्ज पाठवा

| Updated on: Apr 15, 2022 | 10:53 AM

पीएचडी असणाऱ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला इथे भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. विषय विशेषज्ञ या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहेत.

Ph.D : पीएचडी वाल्यांसाठी नोकरी ! परीक्षा द्यावी लागणार नाही, 5 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख, या पत्त्यावर अर्ज पाठवा
'पीएचडी' वाल्यांसाठी नोकरी !
Image Credit source: Facebook
Follow us on

अकोला : पीएचडी (Ph.D) असणाऱ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला इथे भरती प्रक्रिया (Recruitment) सुरु करण्यात आली आहे. विषय विशेषज्ञ या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. एकूण 04 जागा उपलब्ध आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं कमाल (Maximum) वय 38 असावं. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 05 मे 2022 आहे. योग्य उमेदवार गुणांवरून निवडला जाईल. अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. अधिक माहितीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

कुलसचिव, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला.

वेतन – 15,900/- ते 39,100

अर्ज शुल्क – 1000/-
राखीव वर्ग – 500/-

पदाचे नाव – विषय विशेषज्ञ

शैक्षणिक पात्रता – Ph.D

एकूण जागा – 04

वयाची अट – 38 वर्षांपर्यंत

निवड करण्याची पद्धत – गुणांवरून

नोकरीचं ठिकाण – अकोला

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

महत्त्वाचे : 

अधिकृत वेबसाईट – https://www.pdkv.ac.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 मे 2022

मूळ जाहिरातीसाठी ही PDF बघावी.

इतर बातम्या :

MNS Banner : शिवसेना मनसेचं पोस्टर वॉर कायम, मनसेने लावलेलं बॅनर पोलिसांनी घेतलं ताब्यात

Pune MNS Vs NCP : मनसेच्या हनुमान चालिसाला राष्ट्रवादीचे जशास तसे उत्तर; हनुमान मंदिरात करणार इफ्तार पार्टी!

Video Navneet Rana | हनुमान जयंतीला हनुमान चालीसा पठण करणार, मंदिरावर भोंगे लावणार; खासदार नवनीत राणा यांचे वक्तव्य