Jobs : इच्छा असेल तर थेट मुलाखतीला जायचं ! 17 जागांसाठी भरती प्रक्रिया, सविस्तर माहिती एका क्लिकवर
कोल्हापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 15 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. खाली दिलेल्या माहितीच्या आधारे जर आपण पात्र उमेदवार असाल तर २५ एप्रिल २०२२ ला मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रं घेऊन उपस्थित राहावे.
कोल्हापूर : कोल्हापूरच्या (Kolhapur) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 17 जागांसाठी अर्ज (Application) मागविण्यात येत आहेत. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी (Candidates) लवकरात लवकर अर्ज करावा. निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. खाली दिलेल्या माहितीच्या आधारे जर आपण पात्र उमेदवार असाल तर 25 एप्रिल 2022 ला मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रं घेऊन उपस्थित राहावे. सहाय्यक प्राध्यापक आणि वैद्यकीय अधिकारी या पदासाठीच्या या जागा आहेत. नोकरीचं ठिकाण कोल्हापूर आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
पदाचे नाव आणि त्या पदासाठी असणाऱ्या रिक्त जागा
एकूण जागा – 15
१) सहाय्यक प्राध्यापक/ Assistant Professor – 06
२) वैद्यकीय अधिकारी / Medical Officer – 11
शैक्षणिक पात्रता
1) सहाय्यक प्राध्यापक/ Assistant Professor – NMC मानकांनुसार पदवी / डी. एन.बी अर्हता धारण
2) वैद्यकीय अधिकारी / Medical Officer – एमबीबीएस (रुग्णसेवेची निकड शैक्षणिक कामकाजाच्या निकडीच्या दृष्टीने बंधापत्रित पदव्युत्तर अर्हता धारक उमेदवारास प्राधान्य दिलं जाईल.
वयाची अट
1) सहाय्यक प्राध्यापक/ Assistant Professor – 40 वर्षांपर्यंत
2) वैद्यकीय अधिकारी / Medical Officer – 38 वर्षांपर्यंत
3) मागासवर्गीय 5 वर्षे सूट
मुलाखतीचे ठिकाण
अधिष्ठाता कार्यालय, राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर, शेंडा पार्क कोल्हापूर.
इतर माहिती
अर्ज शुल्क – शुल्क नाही
नोकरीचं ठिकाण – कोल्हापूर (महाराष्ट्र )
वेतन – 75,000/- रुपये ते 1,00,000/- रुपये
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
महत्त्वाचे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 एप्रिल 2022
मूळ जाहिरातीसाठी ही PDF बघावी.
अधिकृत वेबसाईट – www.rcsmgmc.ac.in
टीप : अधिकृत आणि सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
इतर बातम्या :