Ex Servicemen : कोल्हापुरात नोकरी हाय, ‘माजी सैनिकांना मान’ हाय ! सविस्तर बातमी वाचा पटल्यास अर्ज करा
कोल्हापूर मध्ये 26 जागांसाठी नोकरी उपलब्ध आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामध्ये 26 जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज पाठवायचे आहेत. 25 एप्रिल 2022 शेवटची तारीख आहे.
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये (Kolhapur) 26 जागांसाठी नोकरी (Job) उपलब्ध आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामध्ये 26 जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज (Application) मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज पाठवायचे आहेत. 25 एप्रिल 2022 शेवटची तारीख आहे. अर्जात जर माहिती अपूर्ण असेल तर अर्ज अपात्र ठरविण्यात येणार आहे. सुरक्षा रक्षक, चौकीदार, सफाई कामगार, सहायक अधीक्षक, स्वयंपाकी, माळी या पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. अर्ज विनाशुल्क आहे. या जागांसाठी माजी सैनिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. अर्ज पाठवल्यावर त्याचं शॉर्ट लिस्टिंग होईल आणि योग्य उमेदवारांना 4 मे 2022 रोजी मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. यासंदर्भातली अधिक माहिती अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर, लाईन बाजार रोड, कसाबा बावडा, कोल्हापूर- ४१६००६
पदांची नावे आणि पदांची संख्या
1) सुरक्षा रक्षक / Security Guard – 07
2) चौकीदार / Chowkidar – 02
3) सफाई कामगार / Cleaner – 02
4) सहाय्यक अधीक्षक / Assistant Superintendent – 02
5) स्वयंपाकी / Cook – 11
6) माळी – 02
वेतन
4,902/- रुपये ते 13,000/- रुपये
महत्त्वाचे
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचं ठिकाण – कोल्हापूर
शेवटची तारीख – 25 एप्रिल 2022
अधिक माहितीसाठी ही PDF बघा.
अधिकृत वेबसाईट – www.kolhapur.gov.in
टीप : अधिकृत माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
इतर बातम्या