मुंबई : व्यवसाय (Business) आणि उद्योग क्षेत्रात उपलब्ध होणाऱ्या स्वयंरोजगाराच्या, रोजगाराच्या (Employment) संधी याबद्द्लची माहिती तरुणांना मिळावी यासाठी एक नवी संकल्पना राबविली जाणार आहे. या संकल्पनेतून ‘महायुवा ॲप’ (Mahayuva App) लाँच करण्यात आलंय. राज्यातील तरुणांना रोजगाराची माहिती उपलब्ध व्हावी, त्यांच्या उद्योजगतेला चालना मिळावी यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची आखणी करण्यात आलीये. याचसाठी हे ॲप तयार करण्यात आलंय. नुकतंच या ॲपचं लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलंय. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सचिव सुरज चव्हाण, आमदार विलास पोतनीस, सिनेट सदस्य मिलिंद साटम, CII MCC चे दयाल कांगणे, सेक्युअर क्रेडेन्टिशियल्स लि. चे व्यवस्थापकीय संचालक राहुल बेलवलकर यांनी या महा युवा ॲपची संकल्पना प्रत्यक्षात आणलीये.
या महायुवा ॲपबरोबरच शिवसेनेकडून स्वयंरोजगार शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलंय. व्यावसायिक होण्याची इच्छा असणारे, महिला बचत गट आणि व्यवसायाचा विस्तार करण्याची इच्छा बाळगणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. गुरुवारी १४ एप्रिल २०२२ रोजी शिवसेना विभाग क्रमांक १ तर्फे या स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठीची नोंदणी आणि कार्यक्रमाचं ठिकाण याबद्दलची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. नवीन उद्योग, महिला बचत गट, लघु उद्योग यांना चालना देण्यासाठी आणि या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत.
सहभागी होण्यासाठी या संकेतस्थळावर नोंदणी करा – www.medahedayuveda.comed
किंवा
या मोबाईल नंबरवर संपर्क करा – 8767510941
शाखा क्र १०, चंदावरकर लेन बोरिवली (प.)
शाखा क्र ९, पेप्सी गार्डनजवळ, गोराई- २, बोरिवली (प.)
आमदार प्रकाश सुर्वे यांचं कार्यालय, अशोकवन, दहिसर (पू.)
इतर बातम्या :