धक्कादायक : मध्य प्रदेशात अमेझॉनवरुन 1 टन गांजाची तस्करी; ऑनलाईन अंमली पदार्थ विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

आरोपी कल्लूने विशाखापट्टणम येथे बनावट पॅन क्रमांक आणि जीएसटी क्रमांकासह ऑनलाइन ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनवर कढीपत्ता विकण्यासाठी आपल्या फर्मची नोंदणी केली होती. याद्वारे ग्वाल्हेर, भोपाळ, कोटा, आग्रा आणि देशाच्या इतर भागांत कढीपत्त्याच्या नावाने गांजा आयात केला जात होता. या व्यवसायात ब्रिजेंद्र हा कल्लूला मदत करायचा.

धक्कादायक : मध्य प्रदेशात अमेझॉनवरुन 1 टन गांजाची तस्करी; ऑनलाईन अंमली पदार्थ विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
धक्कादायक : मध्य प्रदेशात अमेझॉनवरुन 1 टन गांजाची तस्करी
Follow us
| Updated on: Nov 15, 2021 | 7:09 PM

मध्य प्रदेश : डिजिटलायझेशनच्या काळात व्यवहार आणि जीवनपद्धती जितकी सोपी झाली आहे, तितकेच त्याचे गैरवापरही होत असल्याचे वारंवार समोर येत आहे. गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी सरकार जितके कायदे कडक करीत आहेत तितकंच गुन्हेगारही गुन्हे करण्यासाठी नवनवीन क्लुप्त्या शोधत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशात उघडकीस आला आहे. घरबसल्या शॉपिंग करण्यासाठी प्रसिद्ध असलेली ई-कॉमर्स कंपनीद्वारे चक्क गांजाच्या तस्करी करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

ऑनलाईन गांजा विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

मध्य प्रदेशातील भिंडमध्ये पोलिसांनी शनिवारी ऑनलाइन गांजा विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून टोळीच्या दोन सदस्यांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून 20 किलो अमली पदार्थ जप्त केला आहे. भिंडचे पोलीस अधीक्षक (एसपी) मनोज कुमार सिंह यांनी सांगितले की, माहिती मिळाल्यावर कल्लू पवैया (30) आणि ढाबा मालक ब्रिजेंद्र तोमर (35) यांना शनिवारी भिंडमधील ग्वाल्हेर रोड येथून अटक करण्यात आली. आरोपींकडून 20 किलो गांजा जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कढीपत्ता विक्रीच्या नावाखाळी गांजा तस्करी

आरोपी कल्लूने विशाखापट्टणम येथे बनावट पॅन क्रमांक आणि जीएसटी क्रमांकासह ऑनलाइन ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनवर कढीपत्ता विकण्यासाठी आपल्या फर्मची नोंदणी केली होती. याद्वारे ग्वाल्हेर, भोपाळ, कोटा, आग्रा आणि देशाच्या इतर भागांत कढीपत्त्याच्या नावाने गांजा आयात केला जात होता. या व्यवसायात ब्रिजेंद्र हा कल्लूला मदत करायचा.

चार महिन्यांत एक टन गांजा विकला

कल्लूने आतापर्यंत एक टन गांजा विकून एक कोटी दहा लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. कल्लूने आपली कंपनी बनावट पॅन नंबर आणि जीएसटी नंबरद्वारे कंपनी चालवली आणि या व्यवसायात ई-कॉमर्स कंपनीला 66.66 टक्के नफाही मिळाला, अशी माहिती एसपी मनोज कुमार सिंह यांनी दिली.

दरम्यान, आरोपी एका आघाडीच्या ई-कॉमर्स कंपनीच्या माध्यमातून त्यांची टोळी चालवत होते आणि या कंपनीला दोन तृतीयांश नफाही मिळत होता. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ई-कॉमर्स कंपनीवर अशा अंमली पदार्थांच्या व्यापारासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल कारवाई केली जाऊ शकते का, याबाबत तपास सुरु असल्याचे मनोज कुमार यांनी सांगितले. (1 ton of ganja smuggled from Amazon in Madhya Pradesh; Online drug gang exposed)

इतर बातम्या

VIDEO: सलमान खुर्शीद यांच्या घरावर दगडफेक, जाळपोळ; पुस्तकात हिंदुत्वाची ISIS आणि बोको हरामशी तुलना केल्याचा वादावरून झाला हल्ला

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा जेलमधील मुक्काम पुन्हा वाढला; 29 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.