Chandrapur : क्राईम शो पाहिल्यानंतर 10 वर्षाच्या मुलाने रचली अपहरणाची कहाणी, पोलिस चक्रावले
महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये एका 10 वर्षाच्या मुलाने केला धक्कादायक प्रकार, जे पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत. शाळेत न गेलेल्या मुलाने आईला फसवण्यासाठी हा प्रकार केला आहे.
चंद्रपूर – महाराष्ट्रातील (Maharshtra) चंद्रपूर (Chandrapur) येथील एका दहा वर्षाच्या मुलाने आपल्या अपहरणाची कहाणी (Abduction story) स्वत: तयार केली आणि स्वत:चं अपहरण झाल्याचं सांगितलं. शाळेचा कंठाला आलेल्या मुलाने आपल्या आईला फसवण्यासाठी अपहरण झाल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताचं पोलिस देखील चक्रावून गेले आहेत. कारण पोलिसांनी खोलवर चौकशी केल्यानंतर आपण मुलाने स्वत:अपहरणाचा बनाव रचल्याचं जाहीर केल आहे. विशेष म्हणजे टिव्हीवर त्याने क्राईमचा शो पाहिल्यानंतर त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली. त्यानंतर त्याने बनाव रचायला सुरुवात केली. एका चालकाने माझे अपहरण केले होते तिथून सुटून मी घर गाठल्याचे त्याने सांगितले.
नेमकं काय घडलं
महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये एका 10 वर्षाच्या मुलाने केला धक्कादायक प्रकार, जे पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत. शाळेत न गेलेल्या मुलाने आईला फसवण्यासाठी हा प्रकार केला आहे. त्यानंतर चौकशीत मुलाने पोलिसांना सांगितले की, टीव्हीवर क्राईम शो पाहिल्यानंतर त्याच्या मनात ही कल्पना आली. “त्याचे एका कार चालकाने अपहरण केले होते. काहीशा गोंधळातून सुटून त्याने घर गाठले आणि आई-वडिलांना याची माहिती दिली. मुलाचे बोलणे ऐकून पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी मुलाने दिलेल्या वाहनाचा क्रमांक आणि चालकाचे स्वरूप यावर काम सुरू केले. शहरातील सीसीटीव्ही फुटेज शोधण्यात आले मात्र कोणताही सुगावा लागला नाही. मुलाला विश्वासात घेऊन पुन्हा विचारणा केल्यावर खरी कहाणी बाहेर आली.
पोलिसांनी कोणाची चौकशी केली
याप्रकरणी अधिक माहिती देताना पोलीस अधिकारी महेश कोंडावार यांनी सांगितले की, मुलाच्या पालकांनी त्यांना सांगितले की, त्यांचा मुलगा सकाळी शाळेत जात असताना पांढऱ्या रंगाच्या कारमधून दोघेजण खाली उतरले आणि त्यांना घेऊन गेले. वाटेत गाडीचा वेग कमी होताच त्याने उडी मारली आणि तो धावतच घरी पोहोचला. पोलिसांनी मुलावर विश्वास ठेवला आणि शहरात लावलेले सीसीटीव्ही तपासले. त्यांना पांढरी गाडी दिसली नाही. त्यावरून पोलिसांना पुन्हा मुलगा खोटी गोष्ट सांगत असल्याचा संशय आला. त्यानंतर आम्ही त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण उघड झाले.