व्हीआयपी दर्शनासाठी मागितले तब्बल 10500 रुपये; ‘या’ अभिनेत्रीने उठवला आवाज

अर्चना गौतमने ट्विटरवर दावा केला आहे की, तिला तिरुपती मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला. मंदिराच्या अधिकाऱ्यांनी तिला "अयोग्य वागणूक" दिली. तिने याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. मंदिराच्या अधिकाऱ्यांनी तिला “दर्शन” भेटीसाठी 10,500 रुपये आकारले.

व्हीआयपी दर्शनासाठी मागितले तब्बल 10500 रुपये; 'या' अभिनेत्रीने उठवला आवाज
व्हीआयपी दर्शनासाठी मागितले तब्बल 10500 रुपयेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 2:30 AM

मुंबई : सर्वसामान्य भक्तांना रांगेत उभे राहण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. त्यामुळे अनेक प्रसिद्ध धार्मिक स्थळांच्या आवारात भक्तांच्या मोठमोठ्या रांगा (Queue) लागल्याचे चित्र दिसते. ज्यांना ह्या रांगांमध्ये तासनतास वेळ खर्ची घालायचा नसतो, ते लोक मग पास किंवा ओळखीने व्हीआयपी (VIP) रांगेचा मार्ग शोधतात. पण या व्हीआयपी रांगेच्या नावाखालीही जेव्हा पैसे उकळले जातात, त्यावेळी त्या रांगेत उभा राहणाऱ्या व्हीआयपीचा संताप कसा अनावर होतो, याचा प्रत्यय एका व्हिडिओतून आला आहे. व्हीआयपी दर्शनासाठी तब्बल 10500 रुपये मागितले गेल्याचे धक्कादायक वास्तव अभिनेत्री (Actress)ने उजेडात आणले आहे.

दर्शन रांगेत पैसे मागितल्याचा गंभीर आरोप

अभिनेत्री-मॉडेल अर्चना गौतम असे व्हीआयपी रांगेतील लुटमारीविरोधात आवाज उठवणाऱ्या अभिनेत्रींचे नाव आहे. अर्चना हिने 2022 ची उत्तर प्रदेश निवडणूक मेरठ जिल्ह्यातील हस्तिनापूर मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार म्हणून लढवली आहे. तिच्या बाबतीत घडलेल्या प्रकाराची सोशल मीडियात चांगलीच चर्चा झाली आहे. झाले असे की, तिच्याकडून सोमवारी आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिराच्या दर्शन रांगेत पैसे मागितले गेले. तिने यासंदर्भात मंदिर अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

हे सुद्धा वाचा

सरकारकडे मागितली दाद, कारवाईची केली मागणी

अर्चना गौतमने ट्विटरवर दावा केला आहे की, तिला तिरुपती मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला. मंदिराच्या अधिकाऱ्यांनी तिला “अयोग्य वागणूक” दिली. तिने याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. मंदिराच्या अधिकाऱ्यांनी तिला “दर्शन” भेटीसाठी 10,500 रुपये आकारले.

हे चुकीचे आहे, असे म्हणणे तिने तिच्या ट्विटमध्ये मांडले आहे. तिने याबाबत आंध्र प्रदेशातील जगन मोहन रेड्डी सरकारकडे दाद मागितली असून मंदिरातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची विनंती देखील केली आहे.

हिंदू धार्मिक स्थळांवर केला ‘हा’ खळबळजनक आरोप

अर्चना गौतम हिने तिच्या ट्विटमधून खळबळजनक आरोप केले आहेत. भारतातील हिंदूंची धार्मिक स्थळे लुटीची अड्डा बनली आहेत. धर्माच्या नावाखाली तिरुपती बालाजी मंदिराच्या परिसरातही महिलांशी असभ्य वर्तन केले जाते. याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.

मी आंध्र सरकारला विनंती करते. व्हीआयपी दर्शनाच्या नावावर एका व्यक्तीकडून 10,500 रुपये घेतले जातात. अशा प्रकारे लुटणे थांबवा, असे ट्विट करीत अर्चनाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.