ये क्या हो रहा है? पंजाबमध्ये पाय ठेवाल तर… गँगस्टर्सच्या धमकीनंतर पोलिसांची सुरक्षा वाढवली

गेल्याच महिन्यात लखबीरसिंग लांडाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिल्ली पोलिसांना धमकावलं होतं. हॅप्पी संघेरा बाबत मी पोस्ट करत आहे.

ये क्या हो रहा है? पंजाबमध्ये पाय ठेवाल तर... गँगस्टर्सच्या धमकीनंतर पोलिसांची सुरक्षा वाढवली
ये क्या हो रहा है? पंजाबमध्ये पाय ठेवाल तर... गँगस्टर्सच्या धमकीनंतर पोलिसांची सुरक्षा वाढवलीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 14, 2022 | 10:56 AM

नवी दिल्ली: कॅनडात राहत असलेल्या गँगस्टर लखबीर सिंग लांडा याने दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला उघड धमकी दिली आहे. स्पेशल सेलचे 12 अधिकारी सिद्धू मुसेवाला मर्डर केसमध्ये दहशतवादाच्या कनेक्शनची चौकशी करत आहेत. या पोलीस अधिकाऱ्यांना धमकी मिळाल्यानंतर त्यांना सुरक्षा देण्यात आली आहे. या पोलीस अधिकाऱ्यांना 24 तास सुरक्षा राहणार आहे. पोलीस कमिश्नर संजय अरोरा यांनी स्पेशल सेल सीपी हरगोविंदर धालीवाल, डीसीपी (स्पेशल सेल) मनिषी चंद्र आणि राजीव रंजन यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. या पोलीस अधिकाऱ्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दिल्ली पोलिसांचं स्पेशल सेल हे अँटी टेरर युनिट आहे. राजीव रंजन हे स्पेशल सेलच्या दोन युनिटला लीड करत आहेत. तर मनिषी चंद्रा पोलीस आयुक्तांचे कर्मचारी अधिकारी (एसओ) म्हणून कार्यरत आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांशिवाय चार एसीपी आणि पाच पोलीस निरीक्षकांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. एक सशस्त्र जवान 24 तास या पोलीस अधिकाऱ्यांच्यासोबत तैनात असेल. साधारणपणे वाय दर्जाची सुरक्षा ही मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, ज्येष्ठ राजकारणी आणि नोकरशहांना दिली जाते.

हे सुद्धा वाचा

लखबीर सिंग लांडा हा मूळचा पंजाबच्या तरनतारन जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो 2017पासून कॅनडात वास्तव्याला आहे. तो पाकिस्तानच्या लाहोरमधील रुग्णालयात मृत्यू पावलेल्या हरविंदर रिंदाचा साथीदार होता. हरविंदर रिंदा हा बीकेआय प्रमुख वाधवा सिंग आणि आयएसआयचा जवळचा होता.

गेल्याच महिन्यात लखबीरसिंग लांडाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिल्ली पोलिसांना धमकावलं होतं. हॅप्पी संघेरा बाबत मी पोस्ट करत आहे. हॅप्पी संघेरा हा स्पेशल सेलचा मास्टरमाइंड होता आणि रॉ एजंटही होता. आम्ही त्याला युरोपमध्ये कंठस्नान घातलं होतं.

तुमच्या सर्वांचे फोटो आमच्याकडे आहेत, हे मला दिल्ली पोलिसांना सांगायचं आहे. तुम्ही जर पंजाबच्या गल्लीबोळातही दृष्टीस पडला तर चांगलं होणार नाही. अन्यथा आम्ही तुमच्या एरियात घुसून तुम्हाला धडा शिकवू, अशी धमकी या सोशल मीडियातील पोस्टमधून देण्यात आली होती.

दिल्लीतून हे लोक पंजाबमध्ये येतात आणि दहशत निर्माण करण्यासाठी खोट्या केसेस दाखल करतात. जे लोक या केसेसला सामोरे जातात ते मुर्ख आहेत. संघेराला कंठस्नान घालण्यासाठी आम्ही कशा पद्धतीने प्लानिंग केली होती हे नंतरच्या पोस्टमध्ये सांगू. त्याच्या सर्व सहकाऱ्यांना आम्ही ओळखतो.

आता त्यांनी तयार राहावं. वर्षभरापासून संघेरा त्यांना वाचवत होता. आता त्यांना कोण वाचवतं हे पाहायचं आहे. जो कोणी चुकीचं काही बोलेल त्याला घरातून बाहेर काढून बदडल्या जाईल. आमच्या नादी लागू नका, असा इशारा लांडा याने दिला आहे.

Non Stop LIVE Update
'माता-भगिनी...', आधी लाडक्या बहिणींना दमदाटी, आता भाजप खासदाराची माफी
'माता-भगिनी...', आधी लाडक्या बहिणींना दमदाटी, आता भाजप खासदाराची माफी.
मारहाण करत लुटलं अन् केली जबरी चोरी, मनसेच्या उमेदवारावर गुन्हा दाखल
मारहाण करत लुटलं अन् केली जबरी चोरी, मनसेच्या उमेदवारावर गुन्हा दाखल.
'...मग मी बघतो तुम्ही आमदार कसे राहता', दादांचा रामराजेंना थेट इशारा
'...मग मी बघतो तुम्ही आमदार कसे राहता', दादांचा रामराजेंना थेट इशारा.
अमित ठाकरे पराभूत होणार? राऊतांकडून भाकीत, 'रोखठोक'मधून काय म्हणाले?
अमित ठाकरे पराभूत होणार? राऊतांकडून भाकीत, 'रोखठोक'मधून काय म्हणाले?.
सुन लो ओवैसी, कोणाचा बाप पैदा झाला तरी आता.., फडणवीसांचा MIM ला इशारा
सुन लो ओवैसी, कोणाचा बाप पैदा झाला तरी आता.., फडणवीसांचा MIM ला इशारा.
'त्या महिलांचे फोटो काढा, आम्हाला द्या..', भाजप नेत्याचा बहिणींना दम
'त्या महिलांचे फोटो काढा, आम्हाला द्या..', भाजप नेत्याचा बहिणींना दम.
'त्या गोंधळानं आमचा राजा वाचला अन् इज्जत राहिली', भरसभेत दादांची कबुली
'त्या गोंधळानं आमचा राजा वाचला अन् इज्जत राहिली', भरसभेत दादांची कबुली.
संजय राऊत अन् राज ठाकरेंमध्ये जुंपली, सभेतून ठाकरेंसह राऊतांवर निशाणा
संजय राऊत अन् राज ठाकरेंमध्ये जुंपली, सभेतून ठाकरेंसह राऊतांवर निशाणा.
'साहेबांचा नाद केला आता...', धनंजय मुंडेंना हरवा; शरद पवार मैदानात
'साहेबांचा नाद केला आता...', धनंजय मुंडेंना हरवा; शरद पवार मैदानात.
मोदींच्या 'एक है तो सेफ है' घोषणेवर संजय राऊतांची टीका, म्हणाले.....
मोदींच्या 'एक है तो सेफ है' घोषणेवर संजय राऊतांची टीका, म्हणाले......