नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांचा मृत्यू
क्रिकेट खेळताना चक्कर येऊन अवघ्या 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकमधल्या सिडको भागात घडली आहे. श्रेयस सुधीर ढोरे, असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
नाशिकः क्रिकेट खेळताना चक्कर येऊन अवघ्या 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकमधल्या सिडको भागात घडली आहे. श्रेयस सुधीर ढोरे, असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
श्रेयस हा सिडकोतल्या रणभूमी मैदानावर क्रिकेट खेळत होता. मात्र, अचानक चक्कर आल्याने तो बेशुद्ध पडला. त्याला त्याच्या मित्रांनी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत. श्रेयसच्या अचानक झालेल्या मृत्यूचा त्याच्या मित्रमंडळींना चांगलाच धक्का बसला आहे. दरम्यान, दुसऱ्या घटनेत देवदर्शन करून परतणाऱ्या महिलेचा महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. ही घटना नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमध्ये घडली. स्वाती शिंदे असे त्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी नांदगावकरांनी रेल्वे प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मोर्चा काढला.
वीज पडून महिला ठार
नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसासोबत वीजेचे तांडव सुरूच आहे. शनिवारी वीज पडून शिरवाडे वणी येथे शेतात काम करणाऱ्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विभा महेश गुरव असे मृत महिलेचे नाव आहे. विभा गुरव या शेतात काम करत होत्या. यावेळी अचानक वीज कोसळल्याने विभा यांचा जागीच मृत्यू झाला.
शेतकऱ्याचा मृत्यू
त्र्यंबक तालुक्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडली. त्यात पहिल्या घटनेत चंद्राची मेट येथे रामू रामचंद्र चंद्रे हे तरुण शेतकरी (वय 38) रानात गुरे चारत होते. दुपारी त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत तालुक्यातील सामुंडी येथे एका झाडावर वीज कोसळली. या झाडाजवळच्या घरातील रंजना वसंत लोमटे (वय 45) व त्यांच्या तीन मुली व मुलगा यांना वीजेचा जबर झटका बसला. त्यात रंजना थोडावेळ बेशुद्ध पडल्या. तर त्यांची नऊ वर्षांची मुलगी छायाला रुग्णालयात दाखल करावे लागले. तिची एक बाजू पूर्णतः बधीर झाली आहे, तर इतर दोन मुली अपेक्षा (वय 14) आणि अक्षरा (वय 11) यांच्या हाताला झटका पडून बेशुद्ध पडले. मात्र, त्यांची प्रकृती ठीक आहे. तिसऱ्या घटनेत अंबई माळरानावर वीज पडली. या घटनेत येथे चरणाऱ्या दहा शेळ्या जागीच ठार झाल्या. सुनील भुतांबरे यांच्या या शेळ्या होत्या.
इतर बातम्याः
मंत्री भुजबळ म्हणतायत, काही व्यापारी भाजपला मानणारे; त्यामुळे त्यांचा बंदला विरोध
मंत्री भुजबळ म्हणतायत, काही व्यापारी भाजपला मानणारे; त्यामुळे त्यांचा बंदला विरोधhttps://t.co/Hj31q2qRuQ#MaharashtraBandh|#YeolaBandh|#Nashik|#OppositionofTraders|#MinisterChhaganBhujbal|#NCP|#Congress|#ShivSena|#BJP
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2021