आई मुलीला म्हणाली, पाणी येत नाहीय, पाण्याची टाकी बघ, मुलीने झाकन उघडून पाहिलं तर बहिणीचाच मृतदेह

हरियाणाच्या यमुनानगर जिल्ह्यात एका 17 वर्षीय मुलीचा मृतदेह पाण्याच्या टाकीत संशयास्पदरित्या आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. खरंतर मृतक मुलगी ही रात्री आपल्या बहिणीच्या घरी झोपली होती.

आई मुलीला म्हणाली, पाणी येत नाहीय, पाण्याची टाकी बघ, मुलीने झाकन उघडून पाहिलं तर बहिणीचाच मृतदेह
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Oct 02, 2021 | 3:54 PM

चंदिगड (हरियाणा) : हरियाणाच्या यमुनानगर जिल्ह्यात एका 17 वर्षीय मुलीचा मृतदेह पाण्याच्या टाकीत संशयास्पदरित्या आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. खरंतर मृतक मुलगी ही रात्री आपल्या बहिणीच्या घरी झोपली होती. पण त्यानंतर ती अचानक पाण्याच्या टाकीत कशी गेली? असा प्रश्न तिच्या कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांना सतावत आहे. विशेष म्हणजे कुटुंबात सारं काही आलबेल होतं. तरीही मुलीचा अशाप्रकारे पाण्याच्या टाकीत मृतदेह कसा आढळला? असा सवाल आता उपस्थित होतोय.

नेमकं काय घडलं?

मृतक 17 वर्षीय मुलीचं नाव तन्नू असं आहे. खरंतर ती आपल्या कुटुंबासह यमुनानगगरमध्ये राहायची. घराच्या वरच्या मजल्यावर तिची विवाहित बहीण आपल्या पतीसह राहते. तन्नू आणि तिची आई नेहमी तिच्या बहिणीकडे रात्री टीव्ही बघण्यासाठी जात असत. तन्नू बऱ्याचदा तिथेच टीव्ही बघून झोपत असे. तन्नू काल (1 ऑक्टोबर) रात्री देखील आपल्या आईसह तिच्या बहिणीच्या खोलीत टीव्ही बघत होती. रात्री तिची आई जेव्हा खाली झोपण्यासाठी निघाली तेव्हा तन्नूने आपल्या आईला आपण इथेच झोपतो, असं सांगितलं. त्यानंतर तिची आई खाली झोपण्यासाठी आली.

आईच्या तन्नूला हाका

सकाळी तन्नूच्या आईने तिला हाका मारल्या. तन्नूच्या बहिणीला हाका मारत तन्नूला खाली पाठवायला सांगितलं. तेव्हा तिच्या बहिणीने तन्नू रात्रीच खाली आली होती, अशी माहिती दिली. त्यामुळे तन्नूची आई विचारात पडली. यादरम्यान घरात किचनच्या बेसिंगमध्ये अचानक पाणी येणं बंद झालं होतं. कदाचित टॅरेसवर असलेल्या पाण्याच्या टाकीत काही कचरा अडकला असेल त्यामुळे पाणी येत नसेल, असा अंदाज तन्नूच्या आईला आला. तिने आपल्या लहान मुलीला म्हणजेच तन्नूच्या लहान बहिणीला टॅरेसवर जावून पाण्याच्या टाकीत अडकलेला कचरा काढण्यास सांगितला.

पाण्याच्या टाकीत तन्नूचा मृतदेह

तन्नूची लहान बहीण टॅरेसवर गेली तेव्हा तिने पाण्याच्या टाकीचं झाकण हे अर्ध उघडलेलं असल्याचं पाहिले. तिने टाकीत ढुंकून बघितलं तेव्हा तिला धक्काच दिला. त्यानंतर ती जोरजोरात ओरडू लागली. कारण त्या टाकीत तन्नूचा मृतदेह पडलेला होता. तन्नूच्या बहिणीचा किंचाळण्याचा आवाज ऐकून घरातील इतर सदस्य आणि आजूबाजूचे नागरिक तिथे आले तेव्हा त्यांनाही मोठा धक्का बसला. तन्नूच्या आईने आक्रोशाने टाहो फोडला.

पोलिसांकडून तपास सुरु

संबंधित घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. पोलीस या घटनेप्रकरणी विविध बाजूंनी तपास करत आहेत. संबंधित घटना ही आत्महत्या की आणखी दुसरं काही आहे याचा तपास पोलीस करत आहेत. पण मृतदेहाच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर काही गोष्टी स्पष्ट होतील, असं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांचा या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

हेही वाचा :

लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, घरही किरायाचं, 21 हजार कोटीच्या गुजरात ड्रग्ज कनेक्शननं तपास, अधिकारीही चक्रावले

औरंगाबादेत जिओ कंपनीचा एरिया मॅनेजर असल्याचे सांगून फसवणूक, सायबर पोलिसांच्या जाळ्यात सापडला

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.