धक्कादायक, पगार फक्त 13 हजार, घोटाळा 21 कोटींचा, आरोपीने गर्लफ्रेंडसाठी जे केलं, त्याने डोळे विस्फारतील
छत्रपती संभाजी नगरमधील विभागीय क्रीडा संकुलाच्या बँक खात्यात मोठा घोटाळा झाला आहे. महत्त्वाच म्हणजे हे सर्व कॉन्ट्रॅक्टवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी केलय. हा घोटाळा कसा केला? त्या पैशातून या 21 वर्षाच्या आरोपीने जे केलं, ते वाचून तुमचे डोळे विस्फारतील.
छत्रपती संभाजी नगरमधील विभागीय क्रीडा संकुलाच्या बँक खात्यात तब्बल 21 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महत्त्वाच म्हणजे कॉन्ट्रॅक्टवर नोकरीला असलेल्या दोन कर्मचाऱ्यांनीच हे सर्व घडवून आणलं. हर्षकुमार अनिल क्षीरसागर असं मुख्य आरोपीच नाव आहे. या प्रकरणात एक महिला लिपिकही आरोपी असून तिला आणि तिच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. हर्षकुमार अनिल क्षीरसागर (21) अजून फरार आहे. यशोदा जयराम शेट्टी (38) आणि तिचा पती जीवन कार्यप्पा विंजडा (47) या दोघा पती-पत्नींना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यांना पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी हर्षकुमार अनिल क्षीरसागर याने बँकेशी पत्रव्यवहार करण्यासाठी बनावट मेल आयडी बनवला. स्वत:चा मोबाइल क्रमांक जोडून घोटाळा केला. त्याने क्रीडा उपसंचालकांची बनावट सही करुन बँकेतून पैसे काढले. आरोपी हर्षकुमार अनिल क्षीरसागरने विभागीय क्रीड संकुल समितीच्या बँक खात्यातील रक्कम स्वत:च्या खात्यात वळवताना वेगवेगळ्या बँकांच्या 12 खात्यांमधून रक्कम फिरवल्याच समोर आलय.
महिला आरोपीला कोर्टात कोसळलं रडू
घोटाळा झाल्याच समजल्यानंतर क्रीडा अधिकारी तेजस कुलकर्णी यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. 22 डिसेंबरला गुन्हा दाखल झाला. मग आरोपींवर अटकेची कारवाई झाली. कोर्टात युक्तीवाद सुरु असतानाच आरोपी यशोदा जयराम शेट्टीला रडू कोसळलं.
या प्रकरणातील मुख्य आरोपीला पगार फक्त 13 हजार
दरम्यान या प्रकरणात फरार असलेला आरोपी हर्षकुमार क्षीरसागर बाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. यातील मुख्य आरोपी हर्षकुमारला फक्त 13 हजार रुपये पगार आहे. त्याने घोटाळ्याच्या पैशातून नुकतीच एक बीएमडब्ल्यू कार खरेदी केली. अन् गर्लफ्रेंडला खुश ठेवण्यासाठी विमानतळासमोरील आलिशान एरियात 2 बीएचके लक्झरी फ्लॅट गिफ्ट केला. हर्षकुमार क्षीरसागर हा बीड बायपास येथे राहतो.