बस अपघातात 22 प्रवाशांचा मृत्यू, बेदरकार चालकाला 190 वर्षांची शिक्षा

मध्यप्रदेशमधील पन्ना येथे सहा वर्षांपूर्वी एका बसचा अपघात झाला होता. या अपघातामध्ये 22 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. दरम्यान सहा वर्षांनंतर न्यायालयाने या प्रकरणात शिक्षा सुनावली आहे. या अपघातासाठी चालकाला जबाबदार ठरवत त्याला तब्बल 190 वर्षांची शिक्षा सुणवण्यात आली आहे.

बस अपघातात 22 प्रवाशांचा मृत्यू, बेदरकार चालकाला 190 वर्षांची शिक्षा
court
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 3:54 PM

भोपाळ : मध्यप्रदेशमधील पन्ना येथे सहा वर्षांपूर्वी एका बसचा अपघात झाला होता. या अपघातामध्ये 22 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. पोलिसांनी सदोष वाहन चालवल्याचा ठपका ठेवत चालक शमसशुद्दी वय 47 याला अटक केले होते. दरम्यान सहा वर्षांनंतर न्यायालयाने या प्रकरणात शिक्षा सुनावली आहे. या अपघातासाठी चालकाला जबाबदार ठरवत त्याला तब्बल 190 वर्षांची शिक्षा सुणवण्यात आली आहे. या प्रकरणावर निकाल देताना न्यायालयाने म्हटले आहे की, उपलब्ध साक्षी पुराव्यावरून आरोपी चालक हाच या अपघाताला जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. त्याने बेजाबरदारपणे वाहन चालवल्याने हा अपघात घडला. या अपघातामध्ये 22 जणांचा मृत्यू झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीला 190 वर्षांची शिक्षा सुणावण्यात येत आहे.

मालकाला दहा वर्षांची शिक्षा

न्यायालयाने पुढे आपल्या निकालात म्हटले आहे की, प्रत्येक मृत्यू झालेल्या व्यक्तीसाठी चालकाला प्रत्येकी दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा एकापाठोपाठ अशी 190 वर्षांची असेल. दरम्यान या प्रकरणात बसच्या मालकाला देखील दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अपघातानंतर पोलिसांनी आरोपींवर आयपीसी कलम 304 (अ) (निष्काळजीपणामुळे मृत्यू), 304 (दोषी हत्या), 279 आणि 337 (दोन्ही रॅश ड्रायव्हिंग) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. अखेर सहा वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला असून, मालकाला 10 वर्षांची तर चालकाला तब्बल 190 वर्षांची शिक्षा सुणवण्यात आली आहे. आतापर्यंत न्यायालयाने कुठल्याही आरोपीला सुणावलेली ही सर्वात प्रदीर्घ शिक्षा असल्याचे बोलेले जात आहे.

4 मे 2015 रोजी नेमके काय घडले?

4 मे 2015 रोजी 65 प्रवाशांना घेऊन एक बस निघाली होती. ही बस मडच्या टेकडीजवळ आली असताना, अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस कोरड्या कालव्यात पडली. या भीषण अपघातानंतर बसला आग लागली. प्रवाशांना बसमधून बाहेर न पडता आल्याने बसमधील 22 प्रवाशांचा जळून मृत्यू झाला होता, तर 12 जण गंभीर जखमी झाले होते. प्रवाशी पूर्णपणे जळाल्याने त्यांची ओळख देखील पटवता आली नाही. बसच्या सदोष रचनेमुळे प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. बसचा अपतकालीन मार्ग हा लोखंडी रॉड लाऊन बंद करण्यात आला होता. तर त्या जागी आणखी एक सीट वाढवण्यात आले होते. चालक त्या दिवशी बेदरकारपणे वाहन चालवत होता. प्रवाशांनी त्याला वाहन हळू चालवण्याची अनेकवेळा विनंती केली मात्र त्याने कोणाचेही ऐकले नाही. परिणामी वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला.

संबंधित बातम्या

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कार टँकरच्या खाली घुसली, काळ आता होता पण वेळ नाही

धक्कादायक! मिरा रोड परिसरातून 8 पिस्तूल जप्त; आरोपीला अटक

एकतर्फी प्रेम प्रकरणातून 22 वर्षीय तरुणीची हत्या, भर बाजारपेठेत तरुणाचा हल्ला

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.