तू चांगलं केलं नाहीस, प्रेमाच्या बदल्यात फसवणूक केलीस, म्हणत 25 वर्षीय तरूणीची आत्महत्या, प्रियकराला पोलिसांनी केली अटक!
नफीसाची बहीण सुलताना हिने रमीज शेख विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आपल्या बहिणीच्या मृत्यूसाठी रमीज शेख दोषी असल्याचा सुलतानाचा आरोप आहे. त्याच्या फसवणुकीमुळे आपल्या बहिणीने आत्महत्या केली. पोलिसांनी रमीजला अटक करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे का, याचा शोध पोलिसांकडून सध्या सुरू आहे.
मुंबई : गुजरातमधील (Gujarat) वडोदरा येथील नूरजाहा पार्क येथे राहणाऱ्या 25 वर्षीय नफीसा खोखरने 20 जूनला गळफास घेऊन आत्महत्या केलीयं. नफीसाने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ (Video) तयार केला असून त्यामध्ये तिने आत्महत्या करण्याचे कारणही सांगितले आहे. प्रेमभंग झाल्यामुळे नफीसाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊस उचलल्याचे व्हिडीओमधून दिसते आहे. आता याप्रकरणी वडोदरा पोलिसांनी (Police) मुख्य आरोपी रमीज शेख याला अटक केली आहे. नफीसाच्या मृत्यूनंतर सहा दिवसांनी पोलिसांनी रमीजला अहमदाबाद येथून अटक केलीयं.
रमीज शेख विरोधात गुन्हा दाखल
नफीसाची बहीण सुलताना हिने रमीज शेख विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आपल्या बहिणीच्या मृत्यूसाठी रमीज शेख दोषी असल्याचा सुलतानाचा आरोप आहे. त्याच्या फसवणुकीमुळे आपल्या बहिणीने आत्महत्या केली. पोलिसांनी रमीजला अटक करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे का, याचा शोध पोलिसांकडून सध्या सुरू आहे. व्हिडिओमध्ये नफीसा रडत म्हणाली की, रमीज तू माझ्यासोबत खूप वाईट केले आहेस. लग्नाला हो सांगून तू मला फसवलं आहेस.
नफीसा व्हिडीओमध्ये म्हणाली की…
पुढे व्हिडीओमध्ये नफीसा म्हणते की, मी तुझी वाट पाहत राहिले, पण तू आलाच नाहीस… हे चुकीचं आहे यार, हे खूप चुकीचं आहे, तू असं करायला नको होतंस. आयुष्यात मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम केले, आणि तू माझ्यासोबत हे केलेस, तू माझी खूप फसवणूक केलीस, मी तुला खूप जास्त वेगळं समजलं होतं, पण तू देखील सर्वांसारखा निघालास, तुझ्यात आणि इतरांमध्ये अजिबात फरक नाहीये. नफिसा म्हणाली, साऱ्या जगाला कळल्यानंतरही तू माझा हात धरला नाहीस, तू खूप वाईट आहेस, तू मला समजून घेत नाहीस, तुझ्या घरच्यांचे म्हणणे आहे की, आमचा त्याच्याशी संपर्क नाही, पण परवा तुला तुझ्या घरी पाहिले.