29 लाखांचे अवैध बायोडिझेल जप्त; नाशिकमध्ये पोलिसांची मोठी कारवाई
नाशिक जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण 29 लाखांचा अवैध बायोडिझेलचा साठा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या बायोडिझेलची विक्री सुरू होती.
नाशिकः नाशिक जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण 29 लाखांचा अवैध बायोडिझेलचा साठा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या बायोडिझेलची विक्री सुरू होती.
नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैधरित्या बायोडिझेल विक्री सुरूय. याची कुणकुण पोलिसांना लागली होती. त्यावरून त्यांनी छापे मारायला सुरुवात केली आहे. मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या विशेष पथकाने मालेगावमध्ये मुंबई – आग्रा महामार्गावर एका पत्र्याच्या शेडवर कारवाई करत सुमारे 13 लाखांचा मुद्देमाल जप्त करत चौघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 5 प्लास्टिक टाक्यांमध्ये भरलेले बावीसशे लिटर बायोडिझेल सदृश्य द्रव्य, 7 रिकाम्या टाक्या, इलेक्ट्रिक नोझल मशीन पाईप, दोन ट्रक असा 13 लाख 50 हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मालेगावच्या मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील म्हाळदे शिवारात एका पत्र्याच्या शेडमध्ये हा गोरख धंदा सुरू होता. मूळमालक नदीम खान रशीद खान, विक्रेता समशुद्दीन कलमुद्दीन यांच्यासह डिझेल भरण्यासाठी आलेल्या दोन ट्रक चालकांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध पवारवाडी पोलीस स्थानकात जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चांदवडमध्येही छापा
पोलीस महानिरीक्षक यांच्या विशेष पथकाने चांदवड येथे कारवाई करत 16 लाख रुपयांचा बायोडिझेलचा साठा जप्त केला आहे. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार मुंबई-आग्रा महामार्ग लागत हॉटेल राजमुद्रा शेजारी मोकळ्या जागेमध्ये धडक दिली. तेव्हा या ठिकाणी बायोडिझेल द्रव्याचा साठा भरून ठेवलेल्या टॅंकमध्ये बेकायदेशीररित्या मशिनच्या साह्याने बाहेर काढून खरेदी- विक्री होत असल्याचे उघड झाले. यावेळी पथकाने तेथे छापा टाकून सोळा लाख रुपयांचा बायोडिझेलचा साठा जप्त केला असून, तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
बायोडिझेल काय असते?
जैविक कचऱ्यापासून बायोडिझेलची निर्मिती होते. डिझेलपेक्षा बायोडिझेल 20 ते 25 रुपयांनी स्वस्त आहे. डिझेल टाकल्यानंतर ठराविक लीटरच्या प्रमाणात 10 ते 20 टक्के बायोडिझेल टाकून वाहन वापर केला पाहिजे. मात्र बायोडिझेल विक्रेते डिझेल, बायोडिझेल व फ्युएल ऑइल या तिन्हींची भेसळ करून विकतात. बायोडिझेल पंपासाठीही पेट्रोलपंपाप्रमाणेच जिल्ह्याधिकाऱ्यांसह प्रदूषण नियंत्रण मंडळ व अन्य विविध विभागांच्या परवानग्या घेणे आवश्यक आहे.
इतर बातम्याः
सीटी स्कॅन नोंदीत झोल करून हॉस्पिटलला 17 लाखांचा गंडा; दोन कर्मचारी नाशिकमधून रफूचक्कर
Aishwarya Rai birthday | ‘ब्युटी विथ ब्रेन’ ऐश्वर्या राय बच्चन करोडोंची मालकीण, जाणून घ्या तिच्या संपत्ती बद्दल सर्वकाही https://t.co/5HPo7PycnW#AishwaryaRai | #AishwaryaraiBachchan | #AishwaryaRaiBachchan
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 1, 2021