चार आण्याची कोंबडी अन्… बिर्याणीसाठी तिघांचा भररस्त्यात राडा, एकाला थेट… काय घडलं त्या रात्री?

मद्याच्या नशेत धुंद असलेल्या तिघांचा एका तरूणाशी बिर्याणीवरून भांडणे झाले. बघता बघता या भांडणाचे मोठ्या वादात रुपांतर झाले अन्...

चार आण्याची कोंबडी अन्... बिर्याणीसाठी तिघांचा भररस्त्यात राडा, एकाला थेट... काय घडलं त्या रात्री?
मानसिक छळातून तरुणाने जीवन संपवले
Follow us
| Updated on: Aug 23, 2023 | 11:13 AM

चेन्नई | 23 ऑगस्ट 2023 : मित्रांसोबत बिर्याणी खायला जाणे एका तरूणाच्या जीवावरच बेतले. बिर्याणी वरून झालेल्या वादानंतर (dispute over biryani) तीन मद्यधुंद आरोपींनी एका व्यक्तीचा जीव घेतल्याने (crime news)  एकच खळबळ माजली आहे. या धक्कादायक घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. बालाजी (वय 22) असे मृत तरूणाचे नाव आहे. शनिवारी रात्री चेन्नईमध्ये ही खळबळजनक घटना घडली.

मृत तरूण बालाजी हा एका प्रायव्हेट कंपनीत काम करत होता. शनिवारी रात्री तो त्याच्या मित्रांसह डिनरसाठी बाहेर पडला होता. मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी व त्याचे मित्र जेव्हा दुकानातून बिर्याणी विकत घेत होते, तेव्हाच तेथे मद्यधुंद अवस्थेतील तीन व्यक्ती पोहोचल्या आणि ते भांडू लागले. त्यांनीही दुकानातून बिर्याणी ऑर्डर केली होती, मात्र दुकानदाराने बालाजी याला प्रथम बिर्याणी दिली. त्यानंतर त्या व्यक्तींनी बालाजीशी वाद घालत त्याला मारहाण केली आणि त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.

तिघांपैकी एक हल्लेखोर रस्त्याच्या मधोमध चालत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्याचवेळी गाडीतील काही लोकांनी हा हल्ला होताना पाहिला, पण कोणीही समोर येऊन त्यांना रोखण्याचे धाडस दाखवले नाही. त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. या घटनेनंतर बालाजीला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.