खोलीत आलात तर लायटर लावू नका, एका आईची आणि तिच्या दोन जवान मुलींच्या सुसाईडची हेलावून सोडणारी कहाणी…
दिल्लीच्या वसंत विहारमध्ये शनिवारी रात्री एकाच कुटुंबातील तीन महिलांनी आत्महत्या केल्या आहेत. प्राथमिक तपासात तिघींचाही मृत्यू गुदमरल्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृत्यू झालेल्या अंजू या आपल्या दोन मुली अंशिका आणि अंकूसोबत फ्लॅटमध्ये राहत होत्या. अंजू यांच्या पतीचे कोरोनामुळे निधन झाले होते. तेव्हापासून कुटुंबियांना आर्थिक चणचण निर्माण झाली होती आणि यामुळे आई आणि मुली डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या असे सांगितले जात आहे.
मुंबई : कोरोनाच्या काळामध्ये अनेकांवर आर्थिक संकंट (Financial problems) आले. तसेच कोरोनादरम्यान अनेकांना आपल्या जीव देखील गमवावा लागला. कोरोमामुळे कुटुंबातील कर्त्याधर्त्या व्यक्तींचे देखील बऱ्याच ठिकाणी निधन झाले. यामुळे अनेक कुटुंबांमध्ये (Family) हालाकीची परिस्थिती निर्माण झाली आहे. इतकेच नव्हेतर अनेक कुटुंबावर खाण्याचे वांदे देखील आले आहेत. अशीच एक घटना दिल्ली येथे घडली आहे. कोरोनामध्ये (Corona) कुटुंब प्रमुखाचा जीव गेला आणि घरामध्ये आर्थिक संकट निर्माण झाले. घरामध्ये अंथरूणावर पडलेली वयस्कर महिला आणि तिशीच्या जवळपास असलेल्या दोन तरूणी यांनी कंटाळून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.
आईसह दोन मुलींची आत्महत्या
दिल्लीच्या वसंत विहारमध्ये शनिवारी रात्री एकाच कुटुंबातील तीन महिलांनी आत्महत्या केल्या आहेत. प्राथमिक तपासात तिघींचाही मृत्यू गुदमरल्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृत्यू झालेल्या अंजू या आपल्या दोन मुली अंशिका आणि अंकूसोबत फ्लॅटमध्ये राहत होत्या. अंजू यांच्या पतीचे कोरोनामुळे निधन झाले होते. तेव्हापासून कुटुंबियांना आर्थिक चणचण निर्माण झाली होती आणि यामुळे आई आणि मुली डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या असे सांगितले जात आहे. यासंदर्भात डीसीपी म्हणाले की, शनिवारी रात्री नऊ वाजता पोलिसांना माहिती मिळाली की वसंत विहार येथील वसंत अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक 207 आतून बंद आहे आणि आवाज देऊन किंवा दारावरची बेल वाजवूनही कोणीही आतून दरवाजा उघडत नाही.
मृत्यूपूर्वी भिंतीवर लिहिली नोट
दिल्ली पोलिस वसंत अपार्टमेंटमध्ये पोहचले असता. फ्लॅटची दरवाजे आणि खिडक्या संपूर्ण बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडला असताना फ्लॅटमधून धुराचे लोट बाहेर आले. आई आणि दोन्ही मुलींचे मृतदेह खोलीत पडले होते. कुटुंबीयांनी मृत्यूपूर्वी भिंतीवर चिठ्ठी चिकटवली होती, खोलीत प्रवेश केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा लायटर किंवा आग लावू नका. खोलीत गॅसमुळे दुर्घटना घडू नये आणि इतर कोणाचेही नुकसान होऊ नये. यासाठी या कुटुंबियांनी अशा प्रकारची चिठ्ठी भिंतीला चिटकून ठेवली होती. यासंदर्भात आजतकने सविस्तर रिपोर्ट दिला आहे.