Video : ‘बाsssस्स! आता नाही सहन होत’ अंगावरचे व्रण दाखवले, बाबांना सॉरी म्हणाली, Video सेंड करत जीव दिला

सदर व्हायरल व्हिडीओमध्ये मनदीप वडिलांची माफी मागते. पतीची सुधरेल, अशी भाबडी आशा आपल्याला होती, असं म्हणते.

Video : 'बाsssस्स! आता नाही सहन होत' अंगावरचे व्रण दाखवले, बाबांना सॉरी म्हणाली, Video सेंड करत जीव दिला
भारतात लग्न, न्यूयॉर्कमध्ये आत्महत्याImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 12:05 PM

मूळच्या उत्तर प्रदेशातील (UP Crime News) विवाहित तरुणीने गळफास घेत न्यूयॉर्कमध्ये आत्महत्या (Married Women Suicide News) केल्यानं खळबळ माजली आहे. आत्महत्येचा अवघे काही क्षण आधी तिने आपल्या वडिलांना एक व्हिडीओ पाठवला. या व्हिडीओमध्ये तिने आपल्याला झालेल्या जखमांच्या खुणा दाखवल्या. वडिलांची माफी मागितली. पतीच्या अमानुष मारहाणीला आता आपण सहन नाही करु शकत, असं म्हणत या तरुणीने वडिलांना व्हिडीओ पाठवल्यानंतर आपली जीवनयात्रा संपवली. बिजनौरमधील या तरुणीने न्यूयॉर्कमध्ये जीव दिला. या घटनेनं तरुणीच्या वडिलांना आणि कुटुंबीयांना मोठा धक्काच बसलाय. या घटनेनंतर आता सोशल मीडियामध्ये या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला. तसंच सीसीटीव्ही फुटेजमध्ये या तरुणीला तिचा पती मारहाण करत असल्याचं दिसून आलं. तसंच तिची मुलंही ‘बाबा प्लीज आईला मारु नका’ अशी केविलवाणी विनंती करताना दिसून आले आहेत. या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला असून न्यूयॉर्कमध्येच या महिलेच्या पतीला अटकही करण्यात आली आहे.

पतीची मारहाण, सासरी छळ

आत्महत्या करण्यात आलेल्या या विवाहित तरुणीचं नाव मनदीप कौर आहे. मनप्रीत 32 वर्षांची होती. 2018 सालापासून ती आपल्या पती आणि मुलांसह न्यूयॉर्कमध्ये राहत होती. रणजोधबीर सिंगसोबत तिचं लग्न झालं होतं. लग्नानंतर ट्रॅवल्सचा बिझनेस करण्यासाठी मनदीपचा पती तिला घेऊन न्यूयॉर्कमध्ये आला. लग्नानंतर मनदीपच्या कुटुंबाकडे 25 लाख रुपयांची मागणी तिच्या पतीकडून आणि सासरकडच्यांकडून केली जात होती. हुंड्याचे पैसे दिले नाहीत, म्हणून मनदीपचा सासरी छळ सुरु होता.

हे सुद्धा वाचा

व्हिडीओ व्हायरल

तिचा पती कधी दारु पिऊन, तर कधी दारु न पिताही मनदीपला बेदम मारहाण करत होता. मारहाणीचे हे व्हिडीओही समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये मनदीपची मुलंही वडिलांपासून आईचा बचाव करण्यासाठी धडपडत असल्याचं आणि केविलवाणा प्रयत्न करत असल्याचं दिसून आलंय. दरम्यान, पतीची जबर मारहाण सहन न झाल्यानं अखेर मनप्रीतने आत्महत्या केली. पण त्याआधी तिनं आपल्या वडिलांना एक व्हिडीओ रेकॉर्ड करुन पाठवला. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहेय.

पाहा व्हिडीओ :

सदर व्हायरल व्हिडीओमध्ये मनप्रीत वडिलांची माफी मागते. पतीची सुधरेल, अशी भाबडी आशा आपल्याला होती, असं म्हणते. पण आता आपल्याला सहन होत नाही. आपल्याला पती बेदम मारहाण करतो आणि आता या सगळ्या गोष्टी असह्य होत असल्याचंही मनदीप कौर व्हिडीओमध्ये सांगताना दिसली आहे. या व्हिडीओनंतर आता ही घटना उघडकीस आली असून 1 ऑगस्ट रोजी मनदीपने आत्महत्या केल्याचंही समोर आलंय. तसंच आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीविरोधात बिजनौरमध्येही गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर न्यूयॉर्कमध्येच त्याला अटक करण्यात आली आहे. तसंच मनदीपच्या सासरच्या लोकांविरोधातही पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतलाय.

आपल्या मुलीला गमावल्यानं अत्यंत दुःखी झालेल्या मनदीपच्या वडिलांना तिच्या सासरच्या लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केलीय. तसंच सोशल मीडियातही जस्टीस फोर मनदीप कौर असा हॅशटॅग ट्रेन्ड होताना पाहायला मिळालाय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.