एका दिवसात त्याने शेतातून 35 हजार कमवले, पण डिलिव्हरी बॉयने फंडा उघड केला…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांत फळे आणि फुलांसह सुमारे 35 हजारांचा प्रसाद या मूर्तींना देण्यात आला. केवळ पैशासाठी आपण हे ढोंग केल्याची कबुलीही पिता-पुत्रांनी दिली आहे.
उन्नाव : ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए’ या म्हणीचा प्रत्यय उत्तर प्रदेशात पहायला मिळाला. लोकांच्या अंधेश्रद्धे (Superstition)चा आणि भोळेपणाचा फायदा घेत एका पिता-पुत्रांनी शेतातून पहिल्याच दिवशी 35 हजार रुपयाची कमाई (Income) केल्याचे उघडकीस आले आहे. या पिता-पुत्रांनी देव-देवतांच्या मूर्ती (Idols) ऑनलाइन मागवल्या आणि आपल्या शेतात पुरल्या. थोड्या वेळाने त्यांनी काही लोकांसमोर शेत खोदण्यास सुरुवात केली. यावेळी खोदकामात त्या मूर्ती काढल्या आणि लोकांना सांगितले की, या मूर्ती 500 वर्षे जुन्या आहेत. ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आणि काही वेळातच गावातील आणि आजूबाजूचे लोक त्यांच्या शेतावर जमू लागले. मात्र एका डिलिव्हरी बॉयमुळे पिता-पुत्रांचे हे थोतांड उघडकीस आले.
मंगळवारपासून येथे शेकडो भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. लोक पूजा करण्यासाठी आले. फळे, फुलांसह नैवेद्य दाखवण्यात आला. दोन दिवसांत येथे 35 हजारांचा नैवेद्य जमा झाला. घटना महमूदपूर गावची आहे. पोलिसांनी आरोपी अशोक कुमार आणि त्याच्या दोन मुलांना अटक केली आहे.
दोन दिवसांत 35 हजाराचा प्रसाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांत फळे आणि फुलांसह सुमारे 35 हजारांचा प्रसाद या मूर्तींना देण्यात आला. केवळ पैशासाठी आपण हे ढोंग केल्याची कबुलीही पिता-पुत्रांनी दिली आहे.
डिलिव्हरी बॉयने केला भांडाफोड
या घटनेचे फोटो ऑनलाइन प्लॅटफॉर्म मीशोचे डिलिव्हरी मॅन गोरेलाल यांनी पाहिले. त्याने फोटो ओळखले. त्यानंतर त्याने त्या भागातील स्टेशन प्रभारींना सांगितले की, मूर्ती ऑनलाइन मागवल्या आहेत. गोरेलालने पोलिसांना सांगितले, या मूर्ती मी अशोकच्या घरी दिल्या होत्या. त्यांचा मुलगा रवी गौतम याने मीशू कंपनीकडून 169 रुपयांना ऑनलाइन मूर्तीची ऑर्डर दिली होती. हा सेट मी 29 ऑगस्टला त्यांच्या घरी पोहोचवला होता.
याप्रकरणी अशोक कुमार, त्यांचा मुलगा रवी गौतम, विजय गौतम यांना अटक करण्यात आल्याचे पोलीस स्टेशनचे प्रभारी अनुराग सिंह यांन सांगितले. हे तिघेही ऑनलाइन मूर्ती खरेदी करून लोकांच्या भावनांशी खेळत होते. (35 thousand earned by father and son in the name of ancient idols in Uttar Pradesh)