AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jaipur : दिल्लीला जाताना महाराष्ट्रातील महिलेवर बलात्कार, एक छोटीशी चूक भोवली

जयपूर (Jaipur) रेल्वे यार्ड परिसरात एका 35 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पीडित महिला ही महाराष्ट्रातील असल्याची माहिती समोर येत आहे.

Jaipur : दिल्लीला जाताना महाराष्ट्रातील महिलेवर बलात्कार, एक छोटीशी चूक भोवली
दिल्लीत दोन पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यातच भिडले
Updated on: Aug 27, 2022 | 9:14 AM
Share

जयपूर : जयपूर (Jaipur) रेल्वे यार्ड परिसरात एका 35 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची माहिती समोर आली आहे. पीडित महिलेच्या पतीने पोलिसांना (Police) दिलेल्या माहितीनुसार ते रेल्वेने (Railway) दिल्लीला निघाले होते. याचदरम्यान पीडित महिला काही वस्तू खरेदी करण्यासाठी स्टेशनच्या बाहेर आली. परंतु तिथे असलेल्या एका व्यक्तीने मी तुम्हाला रेल्वेचे आरक्षित तिकीट मिळून देतो असे सांगत या महिलेला त्याने रेल्वे यार्डजवळ असलेल्या एका निर्जन स्थानी नेले. जीथे आधीच तीन ते चार जण दबा धरून बसले होते, त्यांनी या महिलेवर सामूहिक बलात्कार केला. मिळत असलेल्या माहितीनुसार पीडित महिला महाराष्ट्रातील रहिवासी असून तीचे लग्न सहा महिन्यापूर्वी जयपूरमध्ये राहणाऱ्या व्यक्तीसोबत झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी कलम 376 (डी) अतर्गंत सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, तपासादरम्यान या महिलेने त्यातील एका तरुणाला ओळखत असल्याचे म्हटले आहे.

सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास

महिलेने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या फुजेटच्या मदतीने तपास सुरू आहे. तसेच या महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, मेडीकल रिपोर्टनंतरच तपासाची पुढील दिशा स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मला रेल्वे स्टेशनच्या बाहेर एक व्यक्ती भेटली, तिने आपल्याला तिकीट आरक्षीत करून देतो, तसेच जेवण देखील देतो असे सांगितले. त्यानंतर त्याने मला एका निर्जन स्थानी नेले तिथे आधीच तीन ते चार लोक होते. त्यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

आरोपींचा तपास सुरू

ही घटना घडल्यानंतर पीडिता रडत रेल्वे पोलीस स्टोशनला पोहोचली. त्यानंतर या महिलेने तक्रार दाखल केली. महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करत आरोपींचा तपास सुरू केला आहे. महिलेने सांगितलेल्या परिसरातील सर्व सीसीटी कॅमेऱ्याचे फुटेज ताब्यात घेण्यात आले असून, पोलिसांनी या आरोपींचा शोध सुरू केला आहे. मात्र अद्याप एकाही आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. मीडिया रिपोर्टनुसर पोलिसांना घटनास्थळी काही पुरावे मिळाले असल्याचा दावा केला जात आहे.

ठाकरे बंधूंची 22 दिवसात दुसरी भेट, तिसऱ्या भेटीचा मुहूर्तही ठरला!
ठाकरे बंधूंची 22 दिवसात दुसरी भेट, तिसऱ्या भेटीचा मुहूर्तही ठरला!.
माझे हात-पाय तोडताना कराडला LIVE पाहायच होतं, पवारांच्या नेत्याचा दावा
माझे हात-पाय तोडताना कराडला LIVE पाहायच होतं, पवारांच्या नेत्याचा दावा.
आरोपांचा डान्सबार अन् महायुतीतच रंगले वार-प्रतिवार?
आरोपांचा डान्सबार अन् महायुतीतच रंगले वार-प्रतिवार?.
5 मंत्र्यांना बडतर्फ करा, ठाकरेंच्या नेत्यांची राज्यपालांकडे लिस्ट अन्
5 मंत्र्यांना बडतर्फ करा, ठाकरेंच्या नेत्यांची राज्यपालांकडे लिस्ट अन्.
अहवाल बदलला जाणार नाही ना? एकनाथ खडसेंचा तपास यंत्रणेवर सवाल
अहवाल बदलला जाणार नाही ना? एकनाथ खडसेंचा तपास यंत्रणेवर सवाल.
45 खासदार गप्प बसले, पण..; राज ठाकरेंचं वर्षा गायकवाड यांना पत्र
45 खासदार गप्प बसले, पण..; राज ठाकरेंचं वर्षा गायकवाड यांना पत्र.
पहलगाम हल्ल्यातल्या 2 अतिरेक्यांना कंठस्नान
पहलगाम हल्ल्यातल्या 2 अतिरेक्यांना कंठस्नान.
ये पब्लिक है...सब जानती है...पलटी मारली म्हणत फडणवीसांचा ठाकरेंना टोला
ये पब्लिक है...सब जानती है...पलटी मारली म्हणत फडणवीसांचा ठाकरेंना टोला.
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचे 20 मिनिटं; भावांमध्ये काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचे 20 मिनिटं; भावांमध्ये काय झाली चर्चा?.
सरकार धोकेबाज आणि विश्वासघातकी; रोहित पवारांचे नवे आरोप
सरकार धोकेबाज आणि विश्वासघातकी; रोहित पवारांचे नवे आरोप.