गुन्हेगारांच्या नांग्या ठेचत उत्तर महाराष्ट्रात 7 कोटींचे अमली पदार्थ जप्त; वेगवेगळ्या प्रकरणांत 171 आरोपींना बेड्या

गेल्या काही महिन्यात नाशिक पोलिसांनी तडाखेबंद कारवाई करत तब्बल 7 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. त्यात ब्राऊन शुगर, चरस, गांजा, कुत्ता गोळी, गुटखा आदींचा समावेश आहे.

गुन्हेगारांच्या नांग्या ठेचत उत्तर महाराष्ट्रात 7 कोटींचे अमली पदार्थ जप्त; वेगवेगळ्या प्रकरणांत 171 आरोपींना बेड्या
उत्तर महाराष्ट्रात पोलिसांनी तडाखेबंद कारवाई करत गुन्हेगारांना वेसण घातली आहे.
Follow us
| Updated on: Oct 30, 2021 | 4:51 PM

नाशिकः गेल्या काही महिन्यात नाशिक पोलिसांनी तडाखेबंद कारवाई करत तब्बल 7 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. त्यात ब्राऊन शुगर, चरस, गांजा, कुत्ता गोळी, गुटखा आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या प्रकरणी एकूण 171 आरोपींना तुरुंगाची हवा खायला पाठवले आहे.

सध्या आर्यन खान प्रकरणामुळे ड्रग्ज तस्करीची जोरदार चर्चा सुरू आहे. नाशिक विभागात काही दिवसांपूर्वी ड्रग्ज तस्करीचे धागेदोरे थेट मालेगावमध्ये सापडले. हे प्रकरणही जिल्ह्यात बरेच गाजले. आता उत्तर महाराष्ट्र परिक्षेत्राचा पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या दीड महिन्यात ड्रग्ज तस्करांवर धडाकेबाज कारवाई केल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी दिली. उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार केल्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले की, गेल्या दीड महिन्यात उत्तर महाराष्ट्रात आठ ठिकाणी गांजाची शेती नष्ट केली. विशेषतः नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात चोरून गांजाची शेती करणे सुरू होते. त्यात नंदुरबारमध्ये तर वनविभागाच्या जागेवर कब्जा करून हे उद्योग सुरू होते. येणाऱ्या काळात नाशिक, धुळे, नगर, नंदुरबार, जळगाव पोलीस अधीक्षकांना गुन्हेगारी रोखण्यासाठी आवश्यक असेल ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.

साठेबाजांवर कारवाई

नाशिक ग्रामीणमध्ये रेशनच्या धान्याचा चोरटा व्यापार सुरू होता. त्यात साडेसहा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. जळगावमधील धरणगावात असाच प्रकार सुरू होता. तिथे जवळपास पावणेतेरा लाखांचा गहू, तांदूळ जप्त केला. विविध ठिकाणच्या कारवाईत 5117 किलो गांजा जप्त करण्यात आला. सोबतच अर्धा किलो ब्राऊन शुगर, 481 ग्रॅम चरस, चार गाड्या, मोटारसायकल, मोबाईल असा एकूण साडेचार कोटींचा मुद्देमाल जप्त केला. एकूण 31 प्रकरणांत कारवाई केली. त्यात 45 आरोपींना बेड्या ठोकल्या. अवैध गुटखा प्रकरणांत 37 कारवाया केल्यात. त्यात 64 आरोपींना बेड्या ठोकल्या. त्यात 2 कोटी 27 लाख 37 हजार 302 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती शेखर यांनी दिली.

कुख्यात सतनामसिंगला बेड्या

तरुणांना शस्त्रे पुरवून गुन्हेगारी विश्वात ढकलणाऱ्या सतनामसिंग या आरोपीलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रात वेगवेगळ्या कारवाईत 40 गावठी पिस्तुल, 84 काडतुसे, 2 मॅक्झिन, 65 तलवार, 8 कोयते, 1 गुप्ती, सत्तुर, चॉपर, चाकू आदी हत्यारे जप्त केलीयत. त्यात 60 गुन्ह्यांमध्ये 62 आरोपींना बेड्या ठोकल्याची माहिती शेखर यांनी दिली. यावेळी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जळगावचे प्रवीण मुंढे, अहमदनगरचे मनोज पाटील आदी उपस्थित होते.

इतर बातम्याः

मोहमयी सोनं होतंय स्वस्त, जाणून घ्या नाशिक सराफातील भाव!

नाशिककरांनो मतदार नाव नोंदणी, दुरुस्ती करायची असल्यास ही कागपत्रे करा सादर!

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.