Kidnapping in Boisar: रेल्वेस्थानकावर झोक्यातून बाळाला पळवले, 8 तासात पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या; नेमकं काय घडलं?

Kidnapping in Boisar: पालघर लोहमार्ग पोलिस ठाण्याचे नव्याने रुजू झालेले पोलीस अधिकारी नरेश रणधीर यांनी तातडीने आपली तपास चक्रे फिरवली.

Kidnapping in Boisar: रेल्वेस्थानकावर झोक्यातून बाळाला पळवले, 8 तासात पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या; नेमकं काय घडलं?
ar: रेल्वेस्थानकावर झोक्यातून बाळाला पळवले, 8 तासात पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्याImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 10:15 AM

हुसैन खान, पालघर: बोईसर येथील अपहरणाच्या (Kidnapping in Boisar) घटनेचा पोलिसांनी (police) अवघ्या आठ तासात छडा लावला आहे. बोईसर रेल्वे स्थानकावर (railway station)  झोका बांधून 8 महिन्याच्या बाळाला या झोक्यात झोपी घालून महिला मजूर रेल्वे ट्रॅकवर काम करत होती. त्याचवेळी तिच्या बाळाचं अपहरण करण्यात आलं. ही घटना लक्षात आली तेव्हा या मोलमजुरी करणाऱ्या महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली. या महिलने जोरजोरात टाहो फोडला. या प्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. लोहमार्ग पोलिसांनीही या बाळाचा तात्काळ शोध सुरू केला. सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले गेले. सर्व रेल्वे स्थानकांना सूचना दिल्या गेल्या आणि अवघ्या आठ तासातच आरोपीच्या मुसक्या आवळत बाळाची सुखरुप सुटका केली. आपल्या कुशीत बाळ आल्यानंतर या माऊलीच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

वर्षा कन्हैया डामोर ही रेल्वे मजूर आपल्या 8 महिन्याच्या महिमा या मुलीला बोईसर रेल्वे स्टेशनवर झोळी झोपवून पतीसोबत रेल्वे ट्रॅक वर काम करण्यासाठी गेली होती. या संधीचा फायदा घेत आरोपीने या मुलीला झोळीतून उचलून तेथून पलायन केले. वर्षासोबत काम करणाऱ्या तिच्या सहकारी महिलेला झोळीत बाळ नसल्याचे समजल्यानंतर तिने वर्षाकडे धाव घेतली व वर्षाला झोळीमध्ये बाळ नसल्याचे सांगितले. वर्षाने हातातले काम सोडून बाळाच्या झोळीकडे धाव घेतली. तिथे आल्यानंतर तिला बाळ न दिसल्याने ती कावरीबावरी झाली व टाहो फोडू लागली. तातडीने तिने बोईसर लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून बाळ पळवून नेल्याची तक्रार दिली. पोलिसांनीही तत्परता दाखवून अज्ञाताने बाळ अपहरण केल्याचा गुन्हा तातडीने दाखल केला.

हे सुद्धा वाचा

असा लागला तपास

पालघर लोहमार्ग पोलिस ठाण्याचे नव्याने रुजू झालेले पोलीस अधिकारी नरेश रणधीर यांनी तातडीने आपली तपास चक्रे फिरवली. त्यानुसार त्यांनी अपहरणाची माहिती रेल्वे स्थानकावर हजर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह गृहरक्षक दलाच्या जवानांना दिली. याच वेळेस मुरबे येथून रेल्वे स्थानकाकडे कामासाठी येत असलेले गृहरक्षक दलाचे जवान योगेश तरे यांना एक जण बाळ घेऊन जात असल्याचे दिसले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता बाळाचा फोटो काढला व पोलीस ठाण्यात पाठवला. त्यानंतर हा फोटो त्या बाळाच्या आईला दाखवल्यानंतर हे बाळ आपलेच असल्याचे या महिलेनी ओळखले व तातडीने पोलिसांनी जवान योगेश तरे याला संपर्क साधून व अतिरिक्त पोलीस बल पाठवून आरोपीला पकडले, अशी माहिती पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांनी सांगितलं.

आरोपी ताब्यात

अवघ्या आठ तासात ही कारवाई तातडीने करण्यात आली. आरोपीला पालघर लोहमार्ग पोलिस ठाण्यात आणले असून तो अटकेत आहे. पोलीस अधिकारी नरेश रणधीर यांनी बाळाचा ताबा आई-वडिलांकडे दिला. आपले बाळ मिळाल्याने बाळाच्या आईवडिलांनी आनंद व्यक्त केला व पोलिसांचे आभार मानले. आरोपीचा मुलांचे अपहरण करणाऱ्या रॅकेटशी संबंध आहे का याबाबतचा पुढील तपास करीत आहेत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.