Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात एअर होस्टेस तरुणीवर बलात्कार, Tinder अ‍ॅपवरून आरोपीसोबत ओळख झाली अन्….

आरोपीने प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरूणीवर अत्याचार करत तिला मारहाण केल्याची माहिती देण्यात आली आहे.

पुण्यात एअर होस्टेस तरुणीवर बलात्कार, Tinder अ‍ॅपवरून आरोपीसोबत ओळख झाली अन्....
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 28, 2020 | 6:33 PM

पुणे : पुण्यातून (pune) महिला अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार (Rape) करण्यात आला आहे. सगळ्यात गंभीर म्हणजे ऑनलाईन डेटिंग साईटवर पीडित तरुणी आणि आरोपीची ओळख झाली होती. आरोपीने प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरूणीवर अत्याचार करत तिला मारहाण केल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. (A 26 year old air hostess raped in Pune)

सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, पीडित तरुणी इंडिगो एअर लाईन्समधील एअर होस्टेस आहे. टिंडर या ऑनलाईन डेटिंग अ‍ॅपवर पीडित तरुणी आणि आरोपीची ओळख झाली. त्यानंतर आरोपीने प्रेमाच्या जाळ्यात ओढत तरुणीवर अत्याचार केले. इतकंच नाहीतर तिला गंभीर मारहाणही करण्यात आली आहे. पीडित तरुणी गंभीर जखमी असून तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस ठाण्यात बलात्कार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीची चौकशी करण्यात येणार आहे. आरोपीने पीडितेला टिंडर अ‍ॅपवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. तिने विरोध केला असता तिला बेदम मारहाणही करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, पोलीस सध्या या प्रकरणात पुढील तपास करत असून आरोपीची कसून चौकशी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी पीडित तरुणीला रुग्णालयात दाखल केलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. इतकंच नाही तर सुरक्षेच्या दृष्टीने पीडितेची वैद्यकीय चाचणीही होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. खरंतर, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हल्लीच्या या ऑनलाईन जगातही मुली धोक्यात असल्याची प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली आहे. (A 26 year old air hostess raped in Pune)

संबंधित बातम्या –

पुण्यातील ताडी विक्रेत्याचं गुजरातपर्यंत कनेक्शन, उत्पादन शुल्कची मोठी कारवाई

विवाहबाह्य संबंधाला मुलाचा अडथळा, प्रियकराच्या मदतीने आईनेच काटा काढला

(A 26 year old air hostess raped in Pune)

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.