सुरुवातीला कमावले, नंतर गमावले; सायबर गुन्हेगारीत अडकला सीए, गमावले १८ लाख

कोणत्याही अनोळखी व्यक्तीला बँक खात्याबद्दल माहिती देऊ नये. सायबर ठग सुरुवातीला पैसे परत करतात. त्यानंतर मोठी रक्कम घेऊन पसार होतात.

सुरुवातीला कमावले, नंतर गमावले; सायबर गुन्हेगारीत अडकला सीए, गमावले १८ लाख
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 10:53 PM

नवी दिल्ली : नोएडातील एक चार्टर्ड अकाउंटंट (सीए) सायबर गुन्हेगारांच्या फाशात अडकला. आरोपींनी त्याला युट्युबवर व्हिडीओ लाईक करण्यास सांगितले. सुरुवातीला काही कमाई झाली. परंतु, नंतर तो त्या दलदलीत फसत गेला. ही घटना सेक्टर ३६ सायबर क्राईम ठाणा सेक्टर ४६ ची आहे. ठाणा प्रभारी रिता यादव यांनी सांगितले की, गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सेक्टर ३६ सायबर क्राईम ठाण्यात राहुल कुमावत यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार आठवड्याभरापूर्वी एक मेसेज आला होता. पार्ट टाईम जॉब करून लाखो रुपये कमवा असं सांगण्यात आलं. मॅसेजमध्ये दिल्या गेलेल्या नंबरवर फोन करण्यात आला. एका व्यक्तीने फोन उचलून स्वतःला कंपनीचा मॅनेजर असल्याचे सांगितले.

टेलिग्राम गृपला जोडले

त्या मॅनेजरने घरी बसून काम करण्याबद्दल समजावून सांगितले. त्यानंतर एका टेलिग्राम गृपला जोडले. त्यांना रोज एका ई कॉमर्स कंपनीचे पेज आणि युट्युब चॅनलचे व्हिडीओवर रिव्हू आणि शेअर करण्याचे काम दिले. त्यातून काही उत्पन्न मिळाले.

हे सुद्धा वाचा

सीएची १८ लाखाने फसवणूक

काही दिवसांनंतर मुख्य काम देऊन १८ लाख रुपये लुटले. जेव्हा त्यांनी ते पैसे मागितले तेव्हा त्यांना टेलिग्राम गृपमधून बाहेर काढण्यात आले. सायबर विशेषज्ञ म्हणतात, सायबर ठग इंटरनेट मीडियाच्या माध्यमातून शिकार शोधत राहतात. तुम्हाला कोण अशाप्रकारचा फोन करत असेल, तर कंपनीच्या बाबतीत व्यवस्थित तपासणी करावी.

कोणत्याही अनोळखी व्यक्तीला बँक खात्याबद्दल माहिती देऊ नये. सायबर ठग सुरुवातील पैसे परत करतात. त्यानंतर मोठी रक्कम घेऊन पसार होतात. नोएडातील सीएने अशाचप्रकारे १८ लाख रुपये गमावले. युट्युबवर लाईक आणि शेअरिंगचे काम दिले होते. सुरुवातीला सीएची कमाई झाली. त्यानंतर फसवणूक झाली. तोपर्यंत १८ लाख रुपये गेले होते.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...