‘स्पा’च्या नावाखाली हॉटेलमध्ये बोलवायचे, मग बंदुकीच्या धाकावर लुटायचे, ‘असे’ अडकले पोलिसांच्या जाळ्यात

नवीन स्पा सेंटर सुरु झाल्याचे ग्राहकांना सांगायचे. मग स्पा साठी हॉटेलमध्ये बोलावून ग्राहकांना लुटायचे. अखेर टोळीचा पर्दाफाश झाला.

'स्पा'च्या नावाखाली हॉटेलमध्ये बोलवायचे, मग बंदुकीच्या धाकावर लुटायचे, 'असे' अडकले पोलिसांच्या जाळ्यात
'स्पा'च्या नावाखाली ग्राहकांना लुटणारी टोळी अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 08, 2023 | 7:33 PM

मुंबई : ‘स्पा’च्या नावाखाली लोकांना हॉटेलमध्ये बोलावून बंदुकीच्या धाकावर लुटणाऱ्या टोळीला वाकोला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून एक देशी कट्टा, तीन काडतुसे, 9 मोबाईल आणि 10 हजार रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. निलेश शिवकुमार सरोज, विशाल राजेश सिंग, आदित्य उमाशंकर सरोज, सुरेश कुमार सरोज, कुलदीप शेषनाथ सिंग, सुरेश रामसिंग विश्वकर्मा, सपोन कुमार, अश्विनी कुमार अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींनी आतापर्यंत किती जणांना अशा प्रकारे लुटले आहे? किती पैसे लुटले? याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.

सर्व आरोपी स्पा सेंटरशी संबंधित

ही टोळी वाकोला परिसरात नवीन स्पा सुरू झाल्याचे सांगायची. मग ग्राहकांना फोन करून हॉटेलमध्ये बोलवायची. ग्राहक हॉटेलमध्ये आल्यावर आरोपी त्यांना बंदुकीच्या धाकावर लुटायचे. टोळीला मुंबईतील वाकोला पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी पूर्वी ‘स्पा’शी संबंधित होते. त्यांच्याकडे जुन्या ग्राहकांचे नंबर होते. त्या नंबरच्या आधारे ते लोकांना कॉल करायचे आणि नंतर त्यांना हॉटेलच्या खोलीत बोलावून बंदुकीच्या धाकावर लुटायचे.

गोवा राज्यातून सराईत चोरटा वसई पोलिसांनी केला अटक

वसई विरार नालासोपाऱ्यात घरफोडी करून फरार होणारा सराईत चोरटा गोवा राज्यातून अटक करण्यात वसई गुन्हे शाखा युनिटने 2 ला यश आले आहे. रोहित उर्फ अरहान चेतन शेट्टी असे अटक सराईत चोरट्याचे नाव असून, हा गोवा राज्यातील साऊथ गोवा, म्हापसा परिसरातील काणका खललपाडा या ठिकाणचा राहणारा आहे. अटक आरोपीवर विरार पोलीस ठाण्यात 6, तुळिंज 03, नायगाव पोलीस स्टेशन 1, पेल्हार पोलीस ठाण्यात 1 असे 12 गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे.

हे सुद्धा वाचा

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.