लग्नात डिजेवर नाचण्यावरुन वाद, मग जे घडलं त्याने लग्नमंडपात शोककळाच पसरली !

लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत डीजेवर नाचण्यावरुन वाद झाला. याच वादातून नको ते घडलं अन् लग्नाच्या आनंदावर विरजण पडलं.

लग्नात डिजेवर नाचण्यावरुन वाद, मग जे घडलं त्याने लग्नमंडपात शोककळाच पसरली !
चंद्रपूरमध्ये डीजेवर नाचण्यावरुन वादातून व्यक्तीची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 17, 2023 | 4:03 PM

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील रामसेतू पुलावर हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या भागातील एका लॉनवर आयोजित लग्नाच्या रिसेप्शनमध्ये डीजेवर नाचण्यावरून काल रात्री दोन गटात वाद झाला. यानंतर पाच ते सहा जणांच्या टोळक्याने किशोर पिंपळकर नामक इसमावर लाठ्या काठ्यांनी हल्ला केला. आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. पीडित पिंपळकर यांना आधी जिल्हा रुग्णालयात, मग नागपूरला करण्यात रेफर आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत, पाचही तरुणांना अटक केली आहे. रामनगर पोलीस हत्येबाबत पुढील तपास करत आहेत.

पोलिसांकडून अधिक तपास सुरु

आदित्य गुडे, रमेश कोमटी, आर्यन चव्हाण, राहुल दीपक आणि राज टेकाम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली गाडी आणि काठ्याही जप्त करण्यात आल्या आहेत. शहरातील रामनगर पोलीस हत्येचा अधिक तपास करत आहेत. आरोपींचा आणि पीडिताचा नक्की काय वाद झाला?, तसेच नक्की डिजेवर नाचण्याच्या वादातून हत्या झाली की काही जुना वाद होता, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

बल्लापूरमध्ये दहशत पसरवणाऱ्या तरुणाची हत्या

परिसरात सतत दहशत निर्माण करणाऱ्या एका युवकाची त्याच परिसरातील 4 जणांनी मिळून हत्या केल्याची घटना बल्लारपूर शहरात घडली. ही थरारक घटना बल्लारपूर शहरातील मौलाना आझाद वार्डात घडली. दीपक रामआसरे कैथवास असे मृतकाचे नाव आहे. बल्लारपूर पोलीस स्टेशन हद्दीतील रवींद्र वार्ड, कारवा रोड येथे राहणारा 28 वर्षीय दीपक कैथवास या युवकाची चार जणांनी मिळून हत्या केली. चारही आरोपींनी पोलीस स्टेशनमध्ये जात आत्मसमर्पण केले.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.