शाळेच्या अभ्यासासाठी स्नॅपचॅट माध्यमातून विद्यार्थिनीशी जवळीक साधली, मग आक्षेपार्ह फोटो पाठवण्यास सांगितले अन्…

नगरमध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

शाळेच्या अभ्यासासाठी स्नॅपचॅट माध्यमातून विद्यार्थिनीशी जवळीक साधली, मग आक्षेपार्ह फोटो पाठवण्यास सांगितले अन्...
नगरमध्ये शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर अत्याचारImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jun 22, 2023 | 10:27 AM

अहमदनगर : नगरमधील जामखेडमध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. शिक्षकाचे कृत्य पाहून पालक वर्गात संतापाची लाट उसळली आहे. शिक्षकानेच 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नराधम शिक्षकाला अटक केली आहे. शिक्षकावर कलम 376 (2) (एफ) (आय) भादविसह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमनुसार बलात्कार आणि पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला श्रीगोंदा न्यायालयाने 26 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राधाकिसन उर्फ राधे जगन्नाथ मुरुमकर असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपी शिक्षकाने आपल्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी अभ्यासाच्या निमित्ताने स्नॅपचॅट या अॅपवर जवळीक साधली. मग मुलीला तिचे आक्षेपार्ह फोटो पाठवण्यास सांगितले. मग या फोटोच्या आधारे ब्लॅकमेल करत तिला बीड जिल्ह्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कुणाला काही सांगितल्यास तिचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. जानेवारी 2023 ते 14 जून 2023 दरम्यान आरोपीने मुलीवर वारंवार अत्याचार केला.

अखेर मुलीने आईला ही बाब सांगितल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. यानंतर पोलिसात धाव घेत आरोपीविरोधात फिर्यादा दाखल केली. पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आरोपीची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे हे करत आहेत. घटना उघड होताच पालकवर्गात संताप निर्माण झाला आहे.

हे सुद्धा वाचा

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.